|
वि. १ हेतु , कल्पना , विकल्प नसणारा ; भेदरहित ( ब्रह्म , देव ). निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाही । परब्रह्मासी । - दा ९ . १ . २ . २ जीव आणि ईश्वर , विशेषण आणि विशेष्य , ज्ञेय आणि ज्ञाता यांमध्ये भेद न मानणारा . ३ एकाग्र . निर्विकल्प समाधि . ४ कल्पना , विकल्पविरहित . नातरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति । - ज्ञा ३ . ५६ . ०समाधि स्त्री. ज्ञाता , ज्ञेय व ज्ञान अशा त्रिपुटाची जीत जाणीव नसते अशी समाधि . याच्या उलट सविकल्प समाधि . ०ज्ञान न. जेथे वस्तूच्या गुणाची , रुपाची वगैरे जाणीव पूर्णपणे नसते असे ज्ञान . याच्या उलट सविकल्प ज्ञान . [ सं . ]
|