|
न. भीति ; धास्ती ; दहशत . भीतीचें निमित्त ; धोका ; जोखीम ; संकट . या वाटेंत कांहीं भय नाहीं खुशाल जावें . भंग ; नाश ; मरण . या घरास सागवानी वांसे घाला म्हणजे १०० वर्षे भय नाहीं . [ सं . भी = भिणें ; भय ] म्ह० एक भय दोहो जागीं ( दोहों पक्षांत परस्पर भीति असणें ). ०घेणें सक्रि . घाबरणें . ०दाखविणें सक्रि . भीतीचें निमित्त दाखवून भिण्यास लावणें . ०कंप पु. भीतीनें कांपणें . [ सं . ] ०यंकर कर - वि . भयजनक ; घोर ; दारुण ; जबरदस्त . [ सं . ] ०कातर वि. भ्यालेला . [ सं . भय + कातर ] ०चकित भीत भीर भीरु - वि . भ्यालेला पांचावर धारण बसलेला . [ सं . ] ०पीडित वि. भयानें पीडिलेला . [ सं . ] ०प्रदर्शन न. भीतिदायक वस्तु , पदार्थ पुढें दाखविण्याची ठेवण्याची , क्रिया . भिवविण्यासाठीं ठेवलेली कोणतीहि वस्तु ; बुजगावणें ( लाकडी शिपाई , फटाकडा इ० ). स्वतःस भीति वाटली आहे असें दाखविणें ; धास्ती घेणें . [ सं . ] ०प्रीति स्त्री. भयानें उत्पन्न झालेली प्रीति . [ सं . ] ०भक्ति भयेंभक्ति - स्त्री . भयानें उत्पन्न झालेली भक्ति ; भावभक्तीहून भिन्न . [ सं . ] ०विव्हल वि. भयानें , धास्तीनें अस्वस्थ , क्षुब्ध झालेला . [ सं . ] ०शील भयाळू - वि . भीरु ; शंकेखोर ; भ्याड ; भित्रट ; भित्रा . [ सं . ] ०सान वि. ( व . ) भयंकर , भीतिप्रद . भयाकुल , भयाक्रांत , भयातुर , भयान्वित , भयार्त वि . भयानें व्याप्त , पीडित असा . [ सं . ] भयांकृत वि . ( गो . ) भयंकर ; भयानक . भयाण , न न . भयपूर्ण उदासपणा ; भीति उत्पन्न करणारा ओसाडपणा ( ओस पडलेल्या घराचा , भयंकर अरण्याचा ). - वि . ओसाड ; उदास ; उजाडीमुळें भयोत्पादक ; घोर . भयानक , भयावह , भयासुर , भ्यासूर पु . नवरसांपैकीं एक . - वि . भयंकर ; घोर ; दारुण ; भयोत्पादक ; भेसूर ; भीतिदायक . देखे भयानक झांकियेलें डोळे । - तुगा २० . - तुगा . [ सं . ] भयानक , भयानक दृष्टि स्त्री . ( नृत्य . ) एखादी भयंकर गोष्ट किंवा एकादें भयंकर श्वापद दृष्टीस पडलें असतां पापण्या निश्चल करुन बुबुळें वरच्या बाजूस घालविणें व बाहुल्या चंचल करणें . हिचा उपयोग भयानक रसांत करितात . [ सं . ] भयाभीत , भयाभित वि . भयभीत . भयाभंगास जाणें अक्रि . तुकडे तुकडे होणें ; रानोमाळ होणें ; नष्ट , भग्न होणें ( राज्य , सैन्य , संपत्ति ). [ भय भंग ] भयांभयां क्रिवि . नीच वृत्तीनें ; दीनपणानें ( क्रि० करणें ; करीत जाणें ; फिरणें ). [ भय ] ०करणें करीत जाणें करीत फिरणें - अक्रि . अत्यंत नीच वृत्तीनें व विपत्तीनें दारोदार भिक्षा मागत हिंडणें . विद्या दरिद्रानें पीडित होऊन लोकांच्या नरकांत बुडून भयांभयां करीत अन्नाचे मागें हिंडतात . - बाळ २ . १२९ . ०होणें अक्रि . अत्यंत हीन , दीन होणें , विपन्न स्थितींत असणें .
|