Dictionaries | References

रास्ती

   
Script: Devanagari
See also:  रास्त

रास्ती

 वि.  १ खरा ; न्याय्य ; नेकीचा ; नीतीचा ; सरळ ( मनुष्य , भाषण , कृत्य , आचरण ). हुजूर आलियावर रास्ती न्याय करुन .... मराआ ३१ .
   खरे ; प्रामाणिक ; नक्की ; पूर्ण मेजाचे ( वजन , माप ). - क्रिवि . खर्‍या रीतीने , न्यायाने , नेकीने ; प्रामाणिकपणाने . [ फा . रास्त ] सामाशब्द -
०कौली  स्त्री. सत्यवक्तेपणा . यांत रास्तकौली इंग्रेजांची कोठून राहिली ? ०ऐटि १ . ५९ . [ फा . ]
०गो वि.  खरे बोलणारा ; सत्यवादी . [ फा . रास्त - गो ]
०गोई  स्त्री. सत्यवादित्व ; खरेपणा ; सत्यभाषण . दुनियेत रास्तगोई परमेश्वराने किनिया दिली आहे . - ऐटि १ . ५९ . [ फा . रास्त गोई ]
०मामलगी  स्त्री. न्याय्य वर्तन . त्याप्रमाणे गायकवाड यांचे पत्र आणून ठेविले असतां महाल गुजारत न केले हे रास्तमामलगी की काय ? - ख ७ . ३५७२ . [ फा . ]
०रवी  स्त्री. सरलगामित्व ; सरळपणा . जदीद करार झाला त्याची ही अहवाल , तेंव्हा रास्तरवी कायमी कोठे राहिली ? - ख ७ . ३५३७ . [ फा . ] रास्ती वि . रास्त ; योग्य . रास्ती माप न . खरे , प्रामाणिक माप , मोजण्याची रीति . याच्या उलट बोटधरनी माप , हातधरणी माप .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP