Dictionaries | References र रिण Script: Devanagari See also: रीण Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रिण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. देणे ; कर्ज ; ऋण . समयी प्राणसमर्पण करुनि तुझे फेडिले नृपा रीण । - मोकर्ण ३ . १८ . [ सं . ऋण ; प्रा . रिण ]०कर ०करी वि. धनको ; सावकार ; ऋणकरी . तुका म्हणे घरी । बहु बैसले रिणकरी । - तुगा ५७१ . कर्जदार ; रिणको ; कर्ज घेणारा .०गस्त वि. कर्जदार ; कर्ज काढणारा ; कर्जात बुडालेला . आळसी खादाड रिणगस्त । - दा १२ . ९ . १ . [ सं . ऋण + ग्रस्त ]०दार वि. कर्जदार ; ऋणको .०फेड स्त्री. कर्जफेड ; कर्जातून मुक्तता ; सुटका .०बोड०बोड्या वि. कर्जात बुडलेला . रिणबोड्या हरी जाणतोसी मुळी । तुजसी निराळी होतो कां रे । - ब ४८६ . [ ऋण + बुडणे ] रिणको , रिणकोनाम वि . कर्ज घेणारा . धनको पहा . रिणाईतस्वरुपी , रिणायत स्वरुपी , रिणायीतस्वरुपी , रिणानुबंध , रिणी ऋणानुबंध ऋणाईत इ० पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP