Dictionaries | References

लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच

   
Script: Devanagari

लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच     

धान्य भिजवून, तें वाळवून नंतर तापलेल्या वाळूंत तें भाजून काढलें म्हणजे लाही तयार होते. धान्यावर इतके सोपस्कार करुन लाही तयार झाल्यावर ती तशीच खाण्यानें कांहीं तिला चव येत नाहीं. पुन्हां ती ताकांत अगर दुधांत भिजवतात, कधीं तिला फोडणीहि देतात आणि मग खातात. थोडक्यांत, दुसर्‍याच्या उपयोगी पडावें म्हणून बिचारें धान्य आपलें सारें जिणें हाल अपेष्टांत आणि कष्टांत घालवतें, तद्वतच मुलीचेंहि असतें. ती उपजल्यापासूनच तिच्यावर संयमाचें दडपण आणण्यांत येतें, तिचें जिणें कष्टासाठीं व दुसर्‍याच्या कारणीं पडण्यासाठीं आहे अशी शिकवण तिला देण्यांत येते व खरोखरींच तिचें आयुष्य संयमांत, परधार्जिणेपणांत व कष्टांत जातें. तु ०- शेळी जाते जिवानिशीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP