Dictionaries | References

दांत ओठ खाणें, चावणें

   
Script: Devanagari

दांत ओठ खाणें, चावणें

   रागानें दांतांवर दांत घासणें, दांतांनीं ओठ चावणे
   अतिशय चिडणें
   रागावणें
   संतापणें
   खाऊं किं गिंळू असें करणें. ‘ भरदरबारांत आपली अशी अवज्ञा झालेली पाहून तो मानी राजा दांत ओंठ खाईल. ’
   उग्र ३. ४. ‘ आणि दुसर्‍याच्या अधराचं आपल्या दांतांनीं खंडण करण्याचं पर्यवसान आपल्याच ठिकाणीं दांत ओठ खाण्यांत होत जातं !’
   एकच प्याला. ‘ कुतुबशहा व सैमदखान कत्तलबाज यांच्या शिरच्छेदाची वार्ता ऐकून दांत ओंठ चावून मनगटें तोडूं लागले.’
   भाब ९८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP