Dictionaries | References

वोढी

   
Script: Devanagari

वोढी

  स्त्री. वोढ , ओढ पहा . १ त्रास ; कष्ट . परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा । - ज्ञा १८ . ९४२ ; - एभा २९ . १०० . २ कल ; आकर्षण . उपस्थीं परमानंद गोडी । यालागी स्त्रीकामाची अति वोढी । केवी साहतील बापुडी । - एरुस्व १ . २ . ४ टंचाई ; कमतरता . अनर्ध्य रत्न हाता चढे । तै भांगाराची वोढी पडे । - ज्ञा १७ . २६८ . ५ धनुष्याची दोरी ; वोढी पहा . ( क्रि० काढणे ). धनुषी काढूं जाणें वोढी । - एभा ११ . ३५६ . ६ धकका ; संकट . होता ब्रह्मांडा घडामोडी । वैकुंठ कैलासा नलगे वोढी । - एभा २४ . २३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP