|
वि. १ आडपडद्यानें , अप्रत्यक्षपणें , अलंकारिक शब्दानें सांगावयाचे , दिग्दर्शित करावयाचे ; सूचक तर्हेने ; हावभावाने किंवा कृतीने गुप्त गोष्टीबद्दल कळवावयाचे जे ते ; व्यंजक ; गर्भित . - न . १ छद्मी , सूचक भाषण ; वक्रोक्ति . २ अलंकारिक भाषण . [ सं . ] व्यंग्य पहा . ०चित्र न. थोडया रेषांनी मूळवस्तूचे वैशिष्टय दाखविणारे चित्र ; ( इं ) कार्टून ; टीकात्मक चित्र . ०व्यंजक पु. ( न्याय ) वाच्य आणि गर्भित वस्तूमधील संबंध . व्यंग्यार्थ - पु . ( साहित्य ) शब्दांचे वाच्य ; लक्ष्य , व्यंग - जे तीन प्रकारचे अर्थ आहेत त्यांतील एक , शब्दाचा वाच्य आणि लक्ष्य यांखेरीज निघणारा खोल अर्थ . व्यंग्योक्ति - स्त्री . १ औपरोधिक , छद्मी भाषण . २ व्यंग्यार्थ - सूचक भाषण . संबंध पु. ( न्याय ) वाच्य आणि गर्भित वस्तूमधील संबंध . व्यंग्यार्थ - पु . ( साहित्य ) शब्दांचे वाच्य ; लक्ष्य , व्यंग - जे तीन प्रकारचे अर्थ आहेत त्यांतील एक , शब्दाचा वाच्य आणि लक्ष्य यांखेरीज निघणारा खोल अर्थ . व्यंग्योक्ति - स्त्री . १ औपरोधिक , छद्मी भाषण . २ व्यंग्यार्थ - सूचक भाषण .
|