Dictionaries | References

शिमगा

   
Script: Devanagari

शिमगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   śimagā m The Holí-festival. 2 The month in which it is held, the month फाल्गुन. Pr. शिमगा जाई आणि कवित्व राही. शि0 करणें To make a noise by bawling and at the same time striking the back of the hand against the mouth. शिमग्याचा मंत्र The mantra or spell pertaining to the Shimga-festival, i. e. बोंब or bellowing and beating the mouth. v जप, म्हण, वाच.

शिमगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The Holi-festival. The month र्फाल्गुन Any riotous and indecent proceeding. A fiasco.
शिमगा करणें   To make noise by bawling and at the same time striking the back of the hand against the mouth.

शिमगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : होळी, होलिका दहन

शिमगा

  पु. १ होळीचा सण ; होळीचे दिवस . २ फाल्गुन महिना . ३ ( ल . ) अश्लील , अचकटविचकट भाषण . [ सं . शृंगार ] म्ह० शिमगा जाई आणि कवित्व राही - शिमग्याचे दिवसांत अचकटविचकट केलेलीं कवनें तदनंतर सुध्दां आठवणींत रहातात . शिमग्याचा मंत्र - पु . बोंब ; शंख ; पांचजन्य . ( क्रि० जपणें ; म्हणणें ; वाचणें ). आहे ते दिवस दिवाळी , असेल ते दिवस दिवाळी , नाहीं ते दिवस शिमगा , नसेल ते दिवस शिमगा - मिळेल तेव्हां उधळपट्टीनें खर्च करणें व न मिळेल तेव्हां उपास करणें . जो मनुष्य आहे ते दिवस दिवाळी नाहीं ते दिवस शिमगा या नात्यानें वागणारा आहे त्याच्या घरादारावरून नांगर फिरून त्याच्या हातांत लवकरच नारळाची आई येण्याचा संभव आहे । - निचं . शिमगा करणें - १ बोंबलणें ; बोंब मारणें . २ ( ल . ) निंदा करणें ; एखाद्याच्या नांवानें खडे फोडणें ; शिव्या देणें .
०सण  पु. १ वधुपक्षांनें वरास बोलावून शिमग्याचा सण साजरा करणें . २ या सणांत विशेषतः रंग पंचमीस दिलेला अहेर , बहुमान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP