Dictionaries | References

सांज

   
Script: Devanagari

सांज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : तिनसांज, तिनपार

सांज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. The phrase agrees with दिपत धरणें.
A rule to make an offering to the god or evil spirits out of the new corn previously to eating of it. v धर, अस. 2 Truthfulness or faithfulness of the ground, i. e. competency to yield the crop which it has yielded commonly, and which is assumed to be due from it. v बाळग, सोड, टाक, & बुड, जा. Also the true or just quantity; the yield warrantably calculated or expected. v ये, भर, उतर or बराबर उतर. The applications therefore of the word are भुईची-जमिनी- ची-धरतीची-काळीची-पांढरची-पिकाची-सांज.

सांज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The evening.

सांज     

ना.  कातरवेळ , तिन्हिसांजा , दिवे लावणीची वेळ , संध्याकाळ , सांजवेळ , सायंकाळ , सूर्यास्तसमय .

सांज     

 स्त्री. १ नवें धान्य निघाल्यावर तें खाण्यापूर्वी बर्‍यावाईट देवतांना अर्पण करण्याची रीत . ( क्रि० धरणे ; असणे ). २ जमिनीच्या पिकाच्या अंदाजाचा खरेपणा ; अंदाजप्रमाणें पीक येण्याची खात्री , तशी जमिनीची पात्रता . ( क्रि० बाळगणे ; सोडणें , टाकणें ; बुडणें , जाणें ). ३ अंदाजलेले , अपेक्षिलेले , उत्पन्न , पीक . ( क्रि० येणें ; भरणें ; उतरणें ). उदा० भुईची जमिनीची - काळीची - पांढरची सांज . रचूनि महत्तत्वाचे खळें । मळी एके काळुगेनि पोळें । तेथ अव्यक्तिची मिळे । सांज भली । - ज्ञा १३ . ३९ . [ ? साच ] सांची - स्त्री . समृद्धि ; वाढ . ( क्रि० येणें ). राशि न सरती जाणो आली सहसा धना तदा सांजी । - मोअश्व ५ . ७२ .
 स्त्री. १ संध्याकाळ ; अस्तमान . तेचि संकल्पाची सांज जै लोपे । - ज्ञा ९ . ७३ ; - तुगा ४०७ . २ संधिप्रकाश ; सांयप्रातःकाल . सांज खुलली पसरली पुसट लाली । - विक १२ . [ सं . संध्या ; प्रा ; संझा ; हिं . सांझ ; गु . सांज ]
०धरणें   सांजेला काढलेल्या दुधाचें तूप करून त्यांत वात बुडवून देवापुढे दिवा लावणें ; दीपव्रत धरणे ; दिपत धरणें . सामाशब्द -
०दिवा  पु. संध्याकाळी देवापुढे लावलेला दिवा ; सांजवात .
०वणवणी  स्त्री. १ संध्याकाळ ; सांज . नाना सुटला सांजवणी । वत्सुचि पां । - ज्ञा १८ . ४८१ . - सिसं ७ . ८२ . २ संध्याकाळचें गोदोहन . जै जाणिजे हातवटी । सांजवणीची । - ज्ञा १८ . १४८३ . ३ धार काढण्याचे पात्र . आघवाचि विषयी भादी । परी सांजवणी टेकों नेदी । - ज्ञा १३ . ६३७ . - निगा २२ .
०वळ  स्त्री. ( अ‍ॅ . ) सांजवेळ
०वात  स्त्री. १ सांजदिवा . २ ( सामा . ) संध्याकाळी लावण्यांत येणारा दिवा ; दिवाबत्ती . ३ ( ल . ) मंद , मिणमिण ज्योतीचा दिवा . ( क्रि . लावणें ; लागणें ).
०वेळ  स्त्री. संध्याकाळ . - एभा २३ . २७८ .
०सकाळ   क्रिवि . सकाळसंध्याकाळ ; सर्वदा ; नेहमी .
०सोंवळें  न. सांयकाळी स्नान न करतां नुसतें ओंवळें वस्त्र सोडून सोंवळें वस्त्र नेसणें ; असा सोंवळेंपणा . सांजवणें , सांजावणें , सांजळणें - अक्रि . संध्याकाळ होणें . दिवस सांजावितो . मला सांजावतें . सांजे , सांझे - क्रिवि . संध्याकाळी . संशप्तक वधुनि विजय सांजे शिबिरासि यावया परते । - मोद्रोण ( नवनीत ३२५ ) सांजाळ , सांजोळ - स्त्री . ( गो . ) संध्याकाळ . सांजोळे दिव्यासी तेल । - अमृत ११३ . सांजेसा - क्रिवि . ( गो . संध्याकाळी ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP