|
स्त्री. १ ( प्र . ) शाळा पहा . न जाय तो पुत्र कदापि साळे । - सारुह २ . ९ . २ सुतार , लोहार , कासार इ० च्या कामाचा कारखाना , ठिकाण ; धंद्याचें स्थळ . मग काळिका झाली प्रसन्न । पुत्रासी देती झाली वरदान तें आदि सांगेन । साळसूत्र । - कालिकापुराण २८ . ५ . ३ ( सामासांत ) जागा ; ठिकाण . उदा० घोडसाळ , टांकसाळ . इ० . गीतसाळ करी कुडी किन्नराची । - भाए २२ . [ सं . शाला ; प्रा . साल ] स्त्री. भात . देशावर साळ म्हणतात . कांडीतसे लंकेशाचें दळ । साळी ऐसें तेधवां । - रावि २० . १८८ . - ज्ञा १८ . ९५ . [ सं . शालि ; प्रा . सालि ] साळवण - न . भाताचा पेंढा . [ सं . शालितूण ] साळीडाळी - स्त्री . अव . मंगळागौर , महालक्ष्मी इ० च्या पूजेमध्यें सोळा मुगाच्या डाळिंब्या व सोळा तांदूळ ही जीं वाहावीं लागतात तीं . [ साळ + डाळ ] साळी ( विणकर ) पहा . स्त्री. साळू ; सायाळ . अंगावर लांब कांटेरी पिसें असणारें जनावर . [ सं . शल्य ] साळजिवाद - न . साळ पहा . साळपीस - न . साळू जनावराचें पीस . साळशीट , साळशीत , साळशीद - न . १ साळपीस . २ साळू . साळशी - स्त्री . साळू . साळिंदर , साळिंद्र , साळिंद्री , साळिंद्रें - साळशीट पहा . साळी , साळू - स्त्री . सायाल जनावर . ०घालणें ( रेशीम , सूत इ० कांची ) जितकें लांब सणंग विणावयाचें असेल तितक्या अंतरावर खुंटया मारून त्यांच्याभोंवतीं सूत गुंडाळून तितका लांब ताणा होई असें करणें . ०घालणें मांडणें - शाळा काढणें . ०वट वटी साळवी साळाऊ - वि . साळयांनीं विणलेलें . याच्या उलट कोष्टी , कोष्टाऊ . ०वाडा पु. विणकर लोक राहतात तो भाग .
|