|
उ.क्रि. बरोबर , व्यवस्थित , करणें , रचणें , ठेवणें ; सरळ , नीट , बरोबर , योग्य , दुरुस्त करणे ; योग्य होणें ; योग्य व व्यवस्थित रीतीनें पुरें करणें , संपविणें . - अक्रि . सरळ , बरोबर , योग्य होणें ; अधिक चांगलें , टापटीपेचें होणें ; सभ्य बनणें . [ सं . शुध्द ; हिं . सुधारना ] सुधारक - पु . १ दोष नाहींसे करूं पाहणारा . २ समाजामध्यें नवीन गोष्टी आणूं पाहणारा ; परंपरेस सोडून नवीन आचारविचारांस अनुसरणारा . सुधारणा , सुधारणी , सुधारणूक , सुधारा - स्त्रीपु . १ योग्य , व्यवस्थित मांडणी ; व्यवस्था ; दुरुस्ती ; अधिकाअधिक पूर्णत्वाकडे जाण्याची किंवा नेण्याची क्रिया . २ परंपरेस सोडून नवीन गोष्टींची समाजांत प्रस्थापना ; पुराण प्रियतेविरुध्द बंड .
|