|
स्त्री. १ लहान घागर . - शर . २ भंडारी लोक दारू काढण्यासाठीं माडावर जें मडकें लावतात तें . घडा पहा . स्त्री. पायघडी ; वरून चालण्याकरितां आंथरलेलें वस्त्र , कापड इ० एवं द्विधा समाधिचिया । तैसी चालतां नेती घडिया । तळीं उपर जाणविती तया । उपनिषदें । - विउ ९ . ७९ . स्त्री. १ घटका ; साठ पळांचा अथवा चोवीस मिनिटांचा अवधि . तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे । - ज्ञा १७ . २५१ . २ ( ल . ) थोडासा वेळ ; क्षण . पृथ्वीचिया पैसारा । - माजीं घडी न लागतां धनुर्धरा । - ज्ञा १० . २५० . ३ योग्य संधि ; वेळ ; काळ . ही पुन्हां न ये बा घडी । - राल ८८ . ४ कालमापनाचें साधन ; यंत्र ; घटका ; वाळूचें घडयाळ ; घडयाळ इ० . ५ ( सामा . ) तास ( इंग्रजी ६० मिनिटांचा ; वेळ मोजण्याचें साधारण माप तास असल्यानें तासाऐवजीं चुकीनें घडी शब्द वापरतात . [ सं . घटी ; प्रा . घडि ; हिं . गु . उ . बं . पं . घडी ] ( वाप्र . ) ( एखाद्याची ) घडी भरणें - १ घटका भरणें पहा . आला समजूं पिशाच आपण घडी भराया माझी । - विक ५५ . २ शिक्षा भोगण्याची वेळ येणें ; घडा भरणें . घडीघटकेचा गुण - ( एखादी गोष्ट अमुक प्रकारेंच कां घडली , तशीच कां घडली नाहीं हें सांगतां येत नसलें म्हणजे वरील वाक्प्रचाराचा उपयोग करतात ). एखादी गोष्ट ज्यावेळी - ज्याक्षणीं घडली असेल त्या विवक्षित वेळेचें सामर्थ्य , प्रभाव , गुण . स्त्री. १ एकेरी वस्त्र , कागद इ० दुहेरी , तिहेरी , चौपदरी केलें असतां होणारी स्थिति , आकार ; दुमड ; चूण ; निरी . इयें पदें नव्हतीं फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मति बुडिया । थाव न निघे ॥ - ज्ञा ७ . १९५ . २ दुमडलेली , चुणलेली स्थिति . ३ घडीबंद कापड , वस्त्र इ० ; उ० लुगडयाची घडी ; कापडाचा , वस्त्राचा सणंग . ४ ( ल . ) संच ; बस्तान ; जम ; संघटित स्थिति ; ऐक्य ; सलोखा ( क्रि० बसणें ; जमणें ; बिघडणें ; मोडणें ); घडी जों मानाची बिघडलि असे तोंवरि घडी । - वामन भामाविलास ११ ( नवनीत पृ १०० ). ५ रचना ; निर्मिति . घडी स्त्रीजातीची घडविलि असे ख्याति सुघडी । - वामन भामाविलास ११ नवनीत पृ . १०० . [ सं . घट = रचणें ] ( वाप्र . ) ०घडी घडोघडीं - क्रिवि . पुन्हां पुन्हां ; वारंवार ; पदोपदी ; घटकोघटकीं घडिघडि पहा . [ घटी द्वि . ] म्ह० घडीघडी लांब दाढी = हरघडीला . रागावणें चरफडणें किंवा दाढी धरणें . घडीचें घडयाळ घडीचें घडयाळें - न . क्षणभंगुर जीवित , शरीर ; पाण्यावरचा बुडबुडा . ०फोडणें ( ढोरांचा धंदा ) चामडयास चुना देऊन त्याची घडी घालतात ती दोन - तीन दिवसांनीं उलगडणें . ०भर क्रिवि . घोडया वेळानें घटकाभरानें ; एका घटकेनंतर ; मागाहून . घडीवट - स्त्री . मुहूर्त ; घटका . बोले इंद्र सुरपती । जालि घडीवटीयांची आईती । नोवरा येऊंद्या झडती । संभ्रमेंसी । - कालिकापुराण १६ . ४२ . [ सं . घटी + वर्त ; म . घडी + वट ] ०बसणें १ समज पटणें ; समजूत होऊन सलोखा होणें ; तुमची उभयतांची घडी बसली म्हणजे मी पैका देईन . २ बस्तान , जम बसणें ; आतां मात्र मनाजोगती घडी बसली . - विवि ८ . ९ . १७४ . ३ योजलेलें कार्य यथास्थित जुळणें . ०बसविणें जम बसविणें ; सुयंत्रित करणें ; बुध्दिमतीनें स्वतां बसविली पतिराज्याची घडी । - विक २८ . ०बिघडणें १ दोन व्यक्तींत असलेला सलोखा नष्ट होणें ; बेबनाव होणें ; वितुष्ट येणें . त्याची आमची घडी बसली होती ती बिघडली . २ ( धंद्याची , कारभाराची , राज्याची ) भरभराट , सुब्यवस्था , सुस्थिति नाहींशी होणें ; विस्कळितपणा येणें ; ( कार्याचा ) सुरळितपणा नष्ट होणें . पुण्याच्या राज्यकारभाराची घडी बिघडली होती . - इंप १३७ . सामाशब्द - - ची टोपी - स्त्री . मोडतां , घडी घालतां येण्याजोगी टोपी ; होडीच्या आकाराची टोपी . - ची पोळी - स्त्री . पदर सुट्लेली , चौपुडी पोळी ; दुमडून लाटलेली पोळी . ०पदर पालव - पु . घडी घातलेल्या वस्त्राचा ( लुगडयाचा , पैठणीचा ) वरचा पदर . [ घडी + पदर ] ०बंद वि. घडी केलेलें ; घडी न मोडलेलें ( वस्त्र , लुगडें , सणंग इ० ). घडिबंद पहा . [ घडी + बंद ]
|