एकशें एक कुलें २१ पित्याचीं, २१ मातेचीं, १२ जामाताचीं, १२ पितृभगिनीचीं, ११ आत्मभगिनीचीं, १६ स्त्रियेचीं व मावशीची. पितरांचें श्राद्धतर्पण केल्यानें त्यांचा उद्धार होतो.
"उद्धरेत् सप्त गोत्राणि कुलमेकोत्तरशतम्"(श्राद्धप्रयोग) (
[दु. श. को.])
एकशें एक यादव कुलें यादबांचीं एकशें एक कुलें होतीं.
"अवतीर्णाः कुलशतं तेषामेकाधिकं नृप"(
[भाग. १०-९०-४४])
एकशे एक प्रमुख नाडया शरीरांत असंख्य नाडया असल्या तरी त्यांतील प्रमुख १०१ आहेत. १०१ वी नाडी हीच मस्तकापर्यंत पोंचणारी सुषुम्ना नाडी.
"शतं चैका च ह्रदयस्य नाडयः। : (कठ २-६-१६)