Dictionaries | References
o

ob-

   
Script: Latin

ob-     

जीवशास्त्र | English  Marathi
(reversed, turned out, inverse) व्यस्त

ob-     

राज्यशास्त्र  | English  Marathi
-व्यस्त, प्रति-
उलट या अर्थाचा लॅटिन भाषेतील उपसर्ग, मराठीतही तसाच उपयोग होतो.
obcompressed पार्श्वदम्न, प्रतिसंपीडित
बाजूने दबलेले (सपाट झालेले)
चपटे
obconical व्यस्त शंक्काकृति
खाली तळाकडे टोकदार व शेंड्याकडे रुंदट, भोवऱ्यासारखे
obcordate व्यस्त हृदयाकृती
हृदयाच्या उलट आकाराचे (पान) उदा. अंबुशी पहा cordate
obdiplostemonous प्रतिद्विवर्तकेसरी
फुलातील दोन केसरमंडलांपैकी बाहेरच्या मंडलातील पाकळ्यासारखी केसरदले त्यांच्यासमोर असून आतील केसरदले त्यांशी एकाआड एक असणारे (केसरमंडल फूल) पहा Burseraceae
obdiplostemony प्रतिद्विवर्तकेसर
वर वर्णिलेला प्रकार
objective वस्तुभिंग
सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करताना वस्तू जवळ असणारे भिंग पहा eyepiece
oblanceolate आयत कुंतसम, व्यस्त कुंताभ
भाल्याच्या उलट आकाराचे, तळाकडे टोकदार पण समांतर धाराचे व लांबट, उदा. खैरचाफ्याचे पान
oblate लघु अक्षीय, लघ्वक्षी, प्रतिकुंताभ
पृथ्वीच्या आकाराप्रमाणे दोन्ही धुवाकडे काहीसे सपाट असलेले, संत्र्याच्या आकाराचे
obligate अनिवार्य, आवश्यक
न टाळता येण्यासारखे, सक्तीचे
obligatory symbiont अनिवार्य सहजीवी
जिवंत राहण्यास सहजीवन बंधनकारक (आवश्यक) असलेले सजीव उदा. दगडफुलातील शैवल व कवक हे दोन घटक
obligulate प्रतिजिव्हिकाकृति
स्तबक मध्याकडे लहान जिभेसारकी पुष्पके असण्याचा प्रकार, तळाकडे रुंद व टोकास निमुळता अशा आकाराचा (पुष्पमुकुट)
oblique तिर्यक्, तिरपे
असमान बाजू (कडा) असलेले, उदा. कडुनिंबाचे दल किंवा बिगोनियाचे पान
oblong आयत
समांतर बाजू असलेले, रुंदीपेक्षा बरीच अधिक लांबी असलेले (पान, फळ, छद इ.) उदा. पेरु, राईकुडा, बिही (Cydonia oblonga mill)
obovate व्यस्त अंडाकृति
देठाकडे अरुंद व शेंड्याकडे अधिक रुंद व गोलसर असलेले (उदा. पान, पाकळी, छद, फळ इ.) अंड्याच्या उलट आकाराचे. उदा. फणस व देशी बदाम यांची पाने, भुईतरवड (Cassia obovata collad).
obovoid प्रत्यंडाभ
वर प्रमाणे आकार असलेले पण घन (उदा. फळ, बी, इ.)
obscure अस्पष्ट, पुसट
अनिश्चित आप्तभाव असलेले
obsolete रुद्ध, अस्पष्ट, अवशिष्ट, कालबाह्य
क्वचितच आढळणारा, ऱ्हसित किंवा लुप्त झालेला (अवयव)
जुनी संज्ञा पहा rudiment
obstructus अंशबद्ध
केस किंवा तत्सम लहान उपांगांनी अंशतः बंद केलेले नलिकाकृति पुष्पमुकुटाचे द्वार
obturbinatus प्रतिकुंभीरुप
कुंभीरुपाच्या (भोवऱ्याच्या) उलट आकाराचे, पहा turbinate, napiform
obtuse विशाल, विशालकोनी
काहीसे गोलसर किंवा बोथट, उदा वडाच्या पानाचे टोक, नागेट्टा (Gordonia obtusa wall).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP