|
चुक्र (चुका) कुल, पॉलिगोनेसी मुहलनबेकिया, चुका, रेवंदचिनी, पोवळी (ँटिगोनॉन) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव बेसींनी पाटलपुष्प गमात (कॅरिओफायलेलीझ) एँग्लर व प्रँटल यांनी व हचिन्सनांनी चुक्रगणात (पॉलिगोनेलिझ) केला आहे. प्रमुख लक्षणे- नलिकेसारखे उपपर्ण असलेल्या एकाआड एक पानांच्या औषधी, द्विलिंगी, नियमित, चक्रीय किंवा अचक्रीय फुले, परिदले३+ , केसरदले ३+३, किंजदले जुळलेली व ऊर्ध्वस्थ किंजपुट, ह्या साधारणतः आढळणाऱ्या व्यवस्थेत फरक आढळतात, किंजपुटात एक कप्पा व एक बीजक, त्रिकोनी कपाली (फळ) सपुष्क बी, फळावर सतत राहणाऱ्या परिदलाचा पंख असतो.
|