Dictionaries | References उ उफराटा Script: Devanagari Meaning Related Words उफराटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 upharāṭā a Reverse, inverse, that is in the wrong direction or on the wrong side. उफराटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Reverse, inverse, on the wrong side. उफराटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उलटा , मागे ;वि. उलट , प्रत्युत्तर ;वि. चुकीचे , विपरीत , विरुद्ध ;वि. अप्रिय , प्रतिकूल , वाईट . उफराटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : विपरीत उफराटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि .उलटा ; विपरीत ; परावृत्त ; मागें विरुद्ध ; अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकीचें उफराटें ॥ - ज्ञा ९ . ५१५ . उफराटे नग्नदेही । अधो पाहात होते मही । - नव १३ . १३ .( ल . ) चुकीचा .उलट ; प्रत्युत्तरदर्शक . बरवेपणें मोठी । होतें लक्ष्मीचे पोटीं । कृष्ण देखोनियां दृष्टी । तेही उफराटी लाजली । - एरुस्व १ . ७३ . [ सं . उत + परावृत ]०न्याय पु. विचित्र , विपरीत न्याय ; अन्याय . म्ह० उफराटा न्याय गालगुंडे खाय . टी गंगा स्त्री . उलट दिशेनें वाहणारी गंगा ; संसाररहाटी , माया यांस उपमा देतात . उफराटीगंगा पाहतां मिळणें । सकळांस तेथें ॥ - दा ११ . ७ . ११ . टी दुनिया स्त्री . उलटें जग ; अव्यवस्था ; बेबंदशाही ; अनिर्बंधता ; अन्याय्याचरण . टी बाहुली स्त्री . अगदीं डोळ्यांजवळ धरल्याशिवाय दिसत नाहीं अशी दृष्टि ; अधुदृष्टि ; मंददृष्टि ; दूरचें दिसत नाहीं अशी नजर . ट्या काळजाचा वि . निष्ठुर ; निर्दय ; कृतघ्न ; अति धाडशी ; अविचारी ( मनुष्य ). टें भांडण न . कृतघ्नतेचें भांडण ; उपकार विसरुन केलेलें भांडण ; अन्यायाचें भांडण ; उपकार , प्रेम करणार्याशीं वितुष्ट . टें शहाणपण न . मूर्खपणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP