Dictionaries | References

कत्तल

   
Script: Devanagari
See also:  कतल

कत्तल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Slaughter or massaere. v कर, उडव. 2 Applied to any general havoc or destruction; to the hewing down of trees, razing of buildings &c. 3 The ceremonies among Muhammadan fakírs on the tenth night of the Muharram.

कत्तल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Slaughter, general havoc.

कत्तल

 ना.  कापाकापी , छाटाछाटी , तोडातोडी , संहार

कत्तल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मोठ्या प्रमाणावर ठार मारण्याची क्रिया   Ex. लालमहालात शिरून मराठ्यांनी कत्तल सुरू केली.
   See : मारामारी

कत्तल

  स्त्री. १ हिंसा ; लढाईत होणारी माणसांची कापाकापी ; छाटाछाटी ; बिजन . ( क्रि०करणें , उडविणें ). कतल पहा . २ सरसकट नाश ; एकजात मोडतोड ( झांडें , इमारती इत्यादिकांची ). ३ मोहरमच्या दहाव्या दिवशीं मुसलमान फकीर जे विधी आचरतात ते . ( अर . कत्ल ) - ची रात्र - स्त्री . १ मोहरमच्या दहाव्या तारखेची रात्र ( या रात्री अलीचे मुलगे लढाईत मेले यावरून ). २ आणीबाणीची वेळ ; ऐन घाईची - गर्दी ची वेळ ; लग्नाघाई . ३ ( ल .) काटाकाटी , कापाकापी . ०खाना - पु . जेथें बकरीं इ० जनावरें मारून त्यांचें मांस विकलें जातें ती जागा ; खाटीकखाना . ' कत्तलखाने गांवाबाहेर नेणें हें आरोग्याच्या दृष्टीनें आवश्यक आहे .' - के २४ . ६ . ३० .
०बाज वि.  हिंसाप्रिय ; रुधिरप्रिय ; कत्तल करणारा . ( अर . कत्‌ल + फा . बाझ ) होणें - मारला जाणें . ' नानापाशीं कत्तल झाला । ' - ऐपो १२० .

कत्तल

   कत्तल करणें
   ठार मारणें
   साफ नाश करणें यावरून (ल.) परीक्षेत नालायक ठरविणें
   उत्तीर्ण न करणें. ‘आमचे परीक्षकही आतां आमची अशीच क तल करणार, नाही?’-दौलत पृ. 34-

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP