Dictionaries | References

करगोटा

   
Script: Devanagari

करगोटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   karagōṭā m A silk cord or silver twist &c., worn around the loins.

करगोटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A silk cord or silver twist worn around the loins.

करगोटा

  पु. 
  1. कमरेस , बांधावयाचा दोरा , गोफ ( रेशमी किंवा चांदी - सोन्याचा ); सोन्याचांदीच्या करगोट्यास घागर्‍या असतात व मध्यें पान ( शिश्वाच्छादन ) असतें . करगोटा अर्व हिंदु लोक घालतात . बडोद्यास श्रावणीच्या दिवशी मराठे मडंळींत राखी व करगोटे बांधण्याची चाल आहे . ' खासी व्यक्ति स्त्री असल्यास राखीबरोबर करगोटा याप्रमाणें ज्या ज्या खाशाकडे तिकडील जबाबदार इसमाच्या नांवावर एखाद्या दिवस आगाउ पाठवून वातणीच्या यादीवर पावत्या घेणें ' - ऐरापुप्र १४ . ६६९ . 
  2. (कों .) रहाटगाडग्याच्या रहाटाच्या चक्रावर बरोबर मध्यावर बांधलेली दोरी ; ही सुंभाची असते . ( सं . कटि + दोरक ; हिं करगदा )

करगोटे बांधणे - वाटणें     ( बायकी ) मुलगा पांच महिन्यांचा झाल्यावर त्यास प्रथम करगोटा बांधतेवेळी त्याचें समवयस्क अशा आर मुलांस एक एक चांदीचा अथवा रेशमीं करगोटा साखर भरलेल्या ( चांदीपितळेच्या अगर खोबर्‍याच्या ) वाटीसह देण्याची चाल आहे

करगोटा

करगोटे बांधणें-वाटणें    (बायकी) मुलगा पांच महिन्यांचा झाल्‍यावर त्‍यास प्रथम करगोटा बांधतेवेळी समवयस्‍क अशा चार मुलांस एक एक चांदीचा अगर रेश्माचा करगोटा साखर भरलेल्‍या चांदीच्या अगर खोबर्‍याच्या वाटीसह देण्याची विधी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP