|
स्त्री. १ चापट ; थापड ; थप्पड ; आघात ; प्रहार ; चपेटा ; तडाखा ( वाघाच्या किंवा मांजराच्या पंजाचा , हाताचा ). मृत्यूव्याघ्रें चपेटघात । मारूनि प्राण घेतला । - मुआदि २७ . १०६ . साहेल काय हरिची गज , गरुडाचीहि लावक चपेट । - मोउद्योग १२ . २४ . २ दुर्दैवाचा किंवा संकटाचा तडाखा , झपाटा . ३ धंद्यांत बसलेली ठोकर किंवा आलेली तूट . ( क्रि० मारणें ; बसणें ). यंदा गुरें मेल्यामुळें मोठी चपेट बसली . ४ लुटारू किंवा पटकी यांचा हल्ला ; धाड . ५ पिकावर हिंव , चिकटा , मोवा पडून किंवा पीक उंदरांनीं खाऊन झालेला नाश . ६ भूत , पिशाच यांचा तडाखा , झपाटा . ७ जुलमी राजाकडून , माणसाकडून झालेलें दु : ख , ताप . ८ लढाईत किंवा युध्दांत बसलेला आघात , लागलेला वार . ९ ( ल . ) हाताची चापट ; तडाखा . - एभा ९ . ४४ . धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा । - तुगा २५६४ . १० वर्चस्व ; सत्ता ; मुठींत येणें . तो माझे चपेटींत येईल त्या दिवशीं मारून निसंतान करीन . - वि . १ हाणून पाडलेला ; उध्वस्त केलेला ; जमीनदोस्त केलेला ; उजाड पाडलेला . २ ( ल . ) खाऊन फस्त केलेला ; खर्चून टाकलेला ; लक्क , साफ केलेला . चपेट ( - नाम ) पहा . [ सं . ] ०साधणें ( व्यापारांत वगैरे ) चांगला लाग साधणें ; चांगलें बस्तान बसणें ; नीट संधान लागणें .
|