|
पु. १ ( इमारत , खांब , ढिला दगड यांची ) लटपटणे , हलणे , डगडगणे , खिळखिळणे इ० क्रिया ; डुगडुग ( क्रि० खाणे ). माझ्या हातच्या इमारतीस डग नाही . २ ( ल . ) डळमळण्याचा संभव , भीति , संकट , एकदम ढासळून पडणे , बूड येणे , फसगत , भीति , त्रास , धोका , नाश इ० होण्याचा खराबी , नुकसान , पराभव , सत्यनाश किंवा वाटोळे होण्याचा संभव . मसलतीस - कामास डग नाही . रुपयास डग नाही . ( = खोटा इ० नाही , तो चाललाच पाहिजे ). - स्त्री . भीति ; संशय ; निराशा ; अंदेशा ; दिक्कत ; शंका ; विकल्प ; किंतु . ( क्रि० खाणे ). [ डगणे ] स्त्री. सीमा ; कांठ ; कड ; किनारा ; मर्यादा . स्त्री. पाऊल ; कदम ; पावंडा ; ढांग ; ढेंग ; टांग ; झडप .
|