Dictionaries | References द दाढ Script: Devanagari Meaning Related Words दाढ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A molar tooth, a grinder. 2 A jaw. 3 C Ground burned in preparation for the seed: also the loppings and grass strewn over the ground to be burned: also the corn growing on ground so prepared. 4 N. D. The ground in which rice is grown from the seed, and from which the plantlets are transplanted. दाढ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A molar tooth. A jaw.दाढेंत सापडणें Be caught in the clutches of. दाढ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अन्न चावायला व त्याचे पीठ करायला वापरण्यात येणारे दात Ex. दाढ काढल्यामुळे तिला जेवायला त्रास होतो HYPONYMY:अक्कल दाढ ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগুৰি ্দাঁত bdहागोमा benমাড়ির দাঁত. পেষক দন্ত gujદાઢ hinदाढ़ kanದವಡೆ ಹಲ್ಲು kasاَرَم kokदाड malഅണപ്പല്ല് mniꯌꯥꯄꯪ oriଚର୍ବଣ ଦାନ୍ତ panਦਾੜ੍ਹ sanदंष्ट्रा tamகடைவாய்ப்பல் telదవడపళ్ళు urdداڑھ , ڈاڑھ दाढ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कों . ) १ भाताचे रोप करावयासाठी भाजलेली जमीन , शेताचा तुकडा . २ ( ल . ) भाताचे रोप करण्यासाठी जमीन भाजण्यासाठी तिच्यावर घातलेला गवत , झाडोरा , इ० ३ ( ल . ) वरीलप्रमाणे भाजलेल्या जमीनीत झालेले भाताचे रोप . ४ ( उत्तरदेश ) ज्यांत भात पेरुन त्याची रोपे उगवल्यावर तेथून उपटून दुसरीकडे लावतात ते शेत . [ सं . दग्ध ; प्रा . द्डढ ] स्त्री. दांताच्या कवळीतील शेवटच्या मोठ्या दांतापैकी प्रत्येक . यांचा उपयोग अन्नाचे चर्वण करण्याचा आहे ; बळाने काढू नये मणि मकर - दाढेत दडला । - वामन - स्फुटश्लोक ( नवनीत पृ . १३३ ). [ सं . दंष्ट्रा ; प्रा . दाढा ; गु . दाढ ; हिं . डाढ ; सिं . डाठ ] दाढ बांधणे - १ ( मंत्र - तंत्र इ० कांच्या योगाने एखाद्याची ) अन्न इ० खाण्याची शक्ति नाहीशी करणे . माझे लेकरुं अलीकडे जेवीनासे झाले आहे . जखिणीने त्याची दाढ बांधली यांत शंका नाही . २ ( एखाद्याचे ) तोंड , बोलणे बंद करणे ; ( एखाद्यास ) निरुत्तर करणे . दाढ सुद्धां न माखणे - ( एखाद्याच्या ) एका दाढेला अन्न इ० सुद्धां न पुरणे ; खाद्य पदार्थाने थोडीशी सुद्धा तृप्ति न होणे . दाढेत सांपडणे - ( एखाद्याच्या ) तावडीत , कचाट्यांत , पेंचांत सांपडणे . सामाशब्द -०बंद पु. ( चित्त्यास ) तोंड उघडता न यावे म्हणून तोंडास घातलेला सुताच्या दोरीचा फांस . खाण्याचे वेळी दाढबंद जरा सैल करितात . - चिमा १४ . [ दाढ + बंद = बांधण्याची दोरी ]०भर वि. खातांखातां दाढ भरेल इतके . - शास्त्रीको . यंदा ऊंस दाढ भर खावयास मिळाले नाहीत .०शृंखळ वि. दाढांबरोबर बाहेरच्या अंगास किंवा गालावर भोंवरा असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ९७ . [ दाढ + सं . शृंखला = साखळी ]०सांखळ सांकल - स्त्री . १ दाढांना होणारा एक विकार . २ ( घोड्याच्या ) दाढेच्या सांध्यावर असलेला भोंवरा . हा अशुभ मानतात . - वि . दाढेच्या सांध्यावर भोंवरा असलेला ( घोडा ) . दाढशृंखळ पहा . [ दाढ + सांखळी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP