Dictionaries | References म माणीक्य Script: Devanagari See also: माणिक , माणिक्य , माणीक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माणीक्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. एक तांबडें रत्न ; लाल नांवाचें रत्न ; हें कुरुंदाचें असून हिर्याच्या खालोखाल कठिण असतें . यानें विद्युत जागृत होते . याच्या खाणी ब्रह्मदेशांत आढळतात . कांहींचा रंग गुलाबी व काळसर अगर सफेत असतो . याच्या पोटजाती :- श्याम , तारा , लाल , माणकी , चुनी लालडी , लालडी ( हीं लहान लालाचीं नावें ), करिपोक , बंकाऊ , जर्दा , रोण ( हीं कमी दर्जाचीं माणकें ), सौगंधिक , नीलगंधि , कंटकारिक , बंधुजीवी , शिखंडिक , गौरिकाख्य , इंद्रगोपी , सीमंतक , कुसुम , गोक्षुर इ० [ सं . माणिक्य ] म्ह० कोळशांतलें माणिक . माशानें माणिक गिळणें - झालेला तोटा पुनः पूर्ण भरुन येणें अशक्य असणें ; दुसर्याच्या हातीं गेलेली वस्तु परत मिळणें अशक्य होणें याअर्थी उपयोग . सामाशब्द -०चौक पु. जेथें लवाजम्याचे लोक रांगेनें उभे राहतात , खेळ खेळतात असें मोठ्या लोकांच्या घरापुढील आवार घातलेलें मैदान .०चौकडी स्त्री. ( राजा . ) उत्सवप्रसंगीं बायकांनीं भिंतीवर काढलेल्या रेखांकित आकृतीपैकीं एक . [ माणीक + चौकडी ]०पैजण न. ( व . ) गव्हाच्या रव्याचा , उकडीचा एक पदार्थ ; फळ .०वात स्त्री. पुढें माणकासारखी गोळी व मागें बोटभर लांब अशी बारीक सुतासारखी केलेली कापसाची वात . हातानें पांच धाग्यांची मिळून वळलेली , दिव्यांत घालावयाची वात .०विंदान्या वि. ( व . ) फाजील नाजूक ( माणूस ). माणिकुली स्त्री . लहान माणिक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP