Dictionaries | References

विरुध्द

   
Script: Devanagari

विरुध्द     

 न. अकल्याण ; अभद्र ; वाईट जें वडिला यां चिंतावें विरुध्द मनें । - ज्ञा १ . २१४ . - वि . प्रतिकूल ; उलट ; विपरीत ; विघ्न करणारें ; अडथळा आणणारें . तें ज्ञानीं विरुध्द काय आहे । हें जाणावें कीं । - ज्ञा १६ . ५६ . ( समासांत ) आचार - उक्त - काल - जन - देश - धर्म - पथ्य - परिभाषा - मार्ग - रीति - लेख - वेदशास्त्र - संप्रदाय - विरुध्द . - धावि . अडथळा झालेलें ; अडखळलेलें . [ वि + रुध् ‍ = अडथळा करणें ]
०भलें वि.  शुभाशुभ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP