ज्येष्ठ शु. प्रतिपदा
Jyeshtha shuddha Pratipada
१ करवीर प्रतिपद्व्रत :
ज्येष्ठ शु. प्रतिपदेस हे व्रत करतात. देवालयाच्या बागेतील करवीर वृक्षाची 'आकृष्णेन रजसा----' या मंत्राने पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. तामिळनाडमध्ये हे व्रत सूर्यव्रतापैकी आहे. फल-दुःख व रोग यांचा नाश
२ करवीरव्रत :
ज्येष्ठ शु. प्रतिपदे दिवशी बागेत जाऊन कणेरीच्या झाडाची पूजा करावी. त्याला मूळ, फांद्या वगैरेसह सचैल स्नान घालून लाल वस्त्र गुंडाळावे. गंध, फुल, धूप, दीप, नैवेद्य आदी विधियुक्त त्याची पूजा करावी. त्याच्यापुढे सप्तधान्ये ठेवावीत व त्यांवर केळी, संत्री, मोसंबी वगैरे फळे ठेवून
'करवीर विषावास नमस्ते भानुवल्लभ । मौलिमंडन दुर्गादिदेवांना सततं प्रिय ॥'
या अगर 'आकृष्णेन रजसा वर्तमानो' मंत्राने प्रार्थना करावी आणि पूजासामग्री ब्राह्मणाला दान द्यावी. घरी येऊन व्रत करावे. हे व्रत सूर्याची आराधना करण्यासाठी आहे.स्त्रियांना संकटकाळी तात्काळ फल देणारे हे व्रत आहे. पूर्वी प्राचीन काळी सावित्री, सरस्वती, सत्यभामा व दमयंती यांनी या व्रताच्या योगाने अभिष्ट प्राप्ती करुन घेतली होती.
N/A
N/A
Last Updated : September 30, 2014
TOP