१ चंपक द्वादशी :
या द्वादशीचे नाव चंपक द्वादशी असे आहे. या दिवशी चंपक पुष्पांनी गोविंदाची पूजा करावी, असे सांगितले आहे.फल-विष्णुलोक प्राप्ती
२ राघव द्वादशी :
या द्वादशीला राघव द्वादशी असेही नाव आहे. हे काम्य व्रत आहे. त्याचा विधी असा- रामलक्ष्मणांच्या सुवर्णमूर्तीची पूजा करावी. त्यावेळी प्रत्येक अवयवाची निरनिराळ्या नावांनी पूजा करावी. नंतर एक घृतपात्र दान द्यावे. फल-पापनाश व स्वर्गवास.