१ पंचतपव्रत :
ज्येष्ठ शु. चतुर्दशीला गार्हपत्य, दक्षीणाग्नी, सभ्य, आहवनीय व भास्कर हे पाच अग्नी प्रज्वलित करावेत व सर्व दिवसभर ते प्रज्वलित ठेवावेत. सायंकाळी शंकर प्रसन्न व्हावेत म्हणून सुवर्णाच्या गाईचे दान देऊन मग स्वतः जेवावे. त्यायोगे शंकर प्रसन्न होतात.