"या प्रकरणास चित्रदीप आसें नाव ठेवण्याचें कारण हेंच कीं येथें आत्म्याच्या चार अवस्था चित्रपटाच्या दृष्टांतानें चांगल्या स्पष्ट करुन दाखविल्या आहेत. चित्रपट म्हणजे धुवट कापडावर खळ लावुन त्याजवर मनुष्य पशु,पक्षी, पर्वत, वृक्ष व नद्या वगैरे सृष्टीवे चित्र काढुन तयार केलेला एक नकाशा होय. "
-------------------- -----------------------------
ज्याप्रमाणें या चित्रपटामध्यें चार अवस्था दिसुन येतात त्याचप्रमाणें परमात्माचे ठायींही अवस्थाचतुष्टय समजावें ॥१॥
पटामध्यें जशा, धौत, घट्टीत, लांछित आणि रंजित ह्मा चार अवस्था आहेत, तशाच आत्माचेठायींही चित, अंतयामी, सुत्रात्मा व विराट अशा चार अवस्था आहेत. ॥२॥
धौत म्हणजे स्वतःसिद्ध मुळवा, शुभ्रपट, घट्टीत म्हनजे खळ दिलेला, लांछित म्हनजे काजळाच्या किंवा कोळशाच्या वगैर रेघांनी आंखलेली आणि रंजित म्हणजे यथायोग्य रंगविलेला हा चित्रपटाचा प्रकार झाला ॥३॥
आणि चित्त म्हणजे स्वतः चिद्रुपी अंतर्यामी म्हणजे मायावी. मुत्रात्मा म्हणजे सुक्ष्मशरीरी आणि विराट म्हणजे स्थुलशरीरी असा परमात्माचा प्रकार समजावा ॥४॥
चित्रपतावरील चित्राप्रमाणें या आत्म्याचेठायांही ब्रह्मादेवापासुन तो अतिसुक्ष्म तृनापर्यंत सर्व स्थावरजंगमात्मक सृष्टी उत्तमाधम भावेंकरुन दृष्टीस पडते ॥५॥
चित्रांतील मनुष्यांना जसे वस्त्रभास निरनिराळे असुन चित्रांस आधारभुत जें वस्त्र तेंच तें असें आम्हीं कल्पितों ॥६॥
त्या प्रमाणें चिदाभासही निरनिराळें असुन आधारभुत चैतन्याशी त्यांचे ऐक्य करुन त्याणीं केलेल्या संसार चैतन्यागतच अशी आम्हांस भ्रांति होते ॥७॥
कल्पित वस्त्रांचेरंग जसे अधारभुत वस्त्रासच लागलेले दृष्टीस पडतात त्याप्रमाणें अज्ञानीं लोक भ्रमाणें जिवांचा संसार आत्म्यास लावुं पहातात ॥८॥
चित्रांतील पर्वतादि जड पदार्थास जशी वस्त्रें नाहीत त्याप्रमाणें सृष्टीतील काष्ठापाणदिकांसहीं चिदाभास नाहीं ॥९॥
वस्तुतः जीवास लागुं असलेला संसार आत्म्यास लावुं पाहणे हीच अविद्या तिची निवृत्ति विद्येवाचुन होत नाहीं ॥१०॥
हा संसार केवळ जीवांनाच लागु असुन आत्म्याला त्याचा मुळींच संबंध नाहीं असं जें ज्ञान त्यासच विद्या असें म्हणतात ती विचारापासुन प्राप्त होत. ॥११॥
याजकरतां जग म्हणजे काय, जीव म्हनजे काय, आणि आत्मा कसा आहे. याचा चांगला विचार करावा. म्हणजे विचाराअंतीं जीव आणि जग ह्मा दोहींचा बाध झाला असतां बाकी अबाधित राहिलेला आत्मा सत्य हें अर्थातच सिद्ध झालें ॥१२॥
वर, जीव आणि जग यांचा बाध करावा असं म्हटलें त्यांत बाधशब्दांचा अर्थ त्यांचे मुळीच न दिसणें नव्हें, तर ती खोटी आहेत असा निश्चय झाला म्हणजे झालें कारण असें जर न मानलें तर सुषुप्तिमुर्च्छादिकांचेष्ठायां श्रमावांचुन मोक्षप्राप्ति होईल ॥१३॥
तसेंच आत्म्याचा अवशेष याचा अर्थ तो सत्य आहे असा निश्चय करणें हा होय जगाचि विस्मरण होणें असा त्यांचा अर्थ केल्यास जीवन्मुक्ति म्हणुन जी म्हणतात ती मुलींच संभवणार नाहीं ॥१४॥
वर सांगितलेली जी विद्या ( ज्ञान ) ती दोनप्रकारची परीक्ष आणि अपरोक्ष अपरोक्ष ज्ञान झालें म्हणजे विचार संपला ॥१५॥
"ब्रह्मा आहे " इतकेंच केवळ गुरुमुखापासुन किंवा श्रुतीपासुन जें समजणें त्यास परोक्षविद्या म्हणतात आणि तें ब्रह्मा मीच आहे असें जेंप्रत्यक्ष अनुभवास येणें त्यास अपरोक्ष विद्या किंवा साक्षात्कार असें म्हणतात ॥१६॥
हा साक्षात्कार झाला असतां जन्ममरणापासुन प्राणी तत्काल मुक्त होतो. म्हणुन यांच्या प्राप्तीकरतां आत्मतत्वांचें विवेचन आम्हीं पुढें करतों ॥१७॥
ज्याप्रमाणें घटकाश, महाकाश, जलाकाश, आणि अभ्राकाश असे आकाशाचे चार प्रकार आहेत त्याप्रमाणे कुटस्थ ब्रह्मा जीव आणि ईश असे चैतन्याचे चार प्रकार आहेत ॥१८॥
ह्मापैकीं घटाकाश हें प्रसिद्धच आहे, म्हणुन त्याविषयीं येथें विशेष सांगणें नलेग महकश म्हणजे ज्यामध्यें सर्व चंद्र व नक्षत्रें प्रकाशित होतात उशी अवाढव्य पोकळीं, जलाकाश म्हणजे घटांतील पाकळांत पाणी घालुन तो आंगणांत ठवला असतां त्यांत साभ्रं नक्षत्र ( ढग आणि नक्षत्रें यांसहित ) जें आभाळाचें प्रतिबिंब पडतें तें ॥१९॥
आणि अभ्राकाश म्हणजे पुर्वाक्त महाकाशामध्ये जेंमेघमंडळ दिसतें त्यातं जे महाकाशाचें प्रतिबिंब तें होय ॥२०॥