पहाटेंस अथवा सांयकाळीं मेद अंधःकारांत जग जसें अस्पष्ट भासतें तसेंच हिरण्यगर्भावस्थेमध्यें भासते. ॥१॥
ज्याप्रमाणें खळ दिलेल्या पट मषीनें आंखलेला सर्वत्र असतो, त्याप्रमाणें ईश्वराचें शरीर या अवस्थेमध्ये सुक्ष्म आकारांनीं लांछित झालेले असतें ॥२॥
अथवा ज्याप्रमाणें धान्य अथवा भाजीपाला यांचे कोंकळे अंकुर भूमीवर उगवतात त्याप्रमाणें या अवस्थेंत जगाचा अंकुर फार कोंवळा असतो ॥३॥
आतां हिरण्यगर्भ अवस्थेला वर जे तीन दृष्टांत दिले त्यांच्यात क्रमेंकरुन स्पष्ट दशा पाहिल्या असतां विराट स्वरुप चांगलें ध्यानांत येईल . म्हणजे मदांधःकार जाउन ऊन पडले असतां जग जसेंस्पष्ट भासतें पट रंगाविला असतां चित्रें जशीं स्पष्ट भासतात अथवा शेतें एक झाली असतां धान्यफळें जशीं स्पष्ट भासतातः त्याप्रमाणें हिरण्यगर्भ विरात रुपानें स्पष्ट भासुंलागतो ॥४॥
विश्वरुपाध्यामध्यें आणि पुरुषसक्तांतही ब्रह्मादेवापासुन तृनापर्यंत य विराटाचे सर्व अवयव आहेत असें म्हटलें आहे ॥५॥
ईश, सुत्र, विराट,ब्रह्मादेव, विष्णु, रुद्र, इंद्र, अग्नि, विघेन्श, भैरव, भैराल, मारिका, यक्ष व राक्षस ॥६॥
विप्र, क्षत्रिय, विट, शुद्र, गाय , घोडा, मृग, पक्षी, अश्वत्थ , वट आम्रवृक्षादि यवादि, धान्यतृणादि, ॥७॥
जल, पाषाण, माति, काष्ठ, वास्याकुद्दालकादिपर्यंत ईश्वर मानुन पुजिले असतां फलदायी होतात ॥८॥
जशीं जशी उपासना करावी तसेंतसेंफळ मिळतें कमज्यास्तफळ मिळणें हे पुज्य देवता आणि पुजेचा प्रकार यांवर अवलंबुन आहे ॥९॥
परंतु मुक्ति ही ब्रह्मात्वाच्याज्ञानावांचुन दुसर्या कोनत्याही उपायानें मिळणार नाही. पहा स्वप्न नाहीसें करावयाचे आहे तर जागेंच झाले पाहिजे त्यावाचुन दुसरा उपाय नाही. ॥२१०॥
एथें स्वप्नाचा दृष्टातही योग्य आहे कारण अद्वितीय ब्रह्मात्वाचेठायीं ईशजीवादिसुनधानें असणारें सर्व चराचर जग स्वप्नान माणेंच आहे ॥११॥
आनंदमय इश्वर आणि विज्ञानमय जीव हे आदिमायेनें कल्पिले आणि त्या उभयाताम्नी बाकी जगांची कल्पना केली. आतां मायेनें कल्पिलें तेंही जगच आहे; तेव्हा जीव आणि इश हे जगापैकीच झाले ॥१२॥
इच्छादिकरुन प्रवेशापर्यंत जी सृष्टी आहे ती इश्वराने आणि जाग्रुतीपासुन मोक्षापर्यंत जी सृष्टी ती जीवानें केलेलीं आहे ॥१३॥
आसंग, अद्वितीय जें ब्रह्मातत्त्वतें न जाणतां मायिक जे जीव आणि ईश यांविषयीं लोक व्यर्थ कलह करितात ॥१४॥
आतां यांनाबोध करुन मार्गास लावावेंअसें कोनी म्हणेल तर आमची रिति अशी आहे तत्त्वनिष्ठांनापाहुन आम्हीं मान डोलवितों अज्ञान्याचा पाहुन आम्हांस वाईटवाटतें आणि भ्रमिष्टांनी आम्ही वादच करित नही ॥१५॥
तृणार्चकापासुन योगवाद्यापर्यंतच सोर ईश्वराविषयीं भ्रातींत पडेल आहेत, आणि लोकायत म्हणजे देहात्मवाद्यांपासुन सांख्यवाद्यापर्यंत सगळे जीवाविषयीं ब्र्हांतीत पडले आहेत ॥१६॥
हे भ्रांत कसे जर ह्मणाल तर जोंपर्यंत अद्वितेय ब्रह्मातत्त्व समजलें नाहीं तोपर्यंतच सर्व भ्रमांतच आहेत असेंम्हटलें पाहिजे अशा लोकंस मुक्तीही नाहीं आणि ऐहिक सुखहि नाहीं ॥१७॥
कोणी म्हणेल की त्यास ब्रह्माज्ञान जरी कदाचित नसलें, तरी इतर विद्येंचे संबंधाचें लहानमोठेपणा आहे, आणी त्याप्रमाणे त्यांना सुखाची प्राप्तीही आहे; तर तसें सुख असुन नसुन सारखेंच त्यांचा आम्हांस काय उपयोग ? स्वप्नांत राज्यप्रांप्ति आणि भिक्षा मागणें या दोन्हीं गोष्टींचा संपर्क जागृताला मुळींच नाहीं ॥१८॥
ह्मणुन मुमुक्षुनीं जीव आणी ईश याविषयींचा वाद सोडुन देऊन ब्रह्मातत्वाचा विचार करावा आणि तें नीट समजुन घ्यावें ॥१९॥
ब्रह्मातत्त्वाचा निश्चय करण्याकरितां तरी या दोन्हीं वादांची आवश्यकता आहे कीं नाहीं असा जर कोनी प्रश्न करील तर त्यास आम्हीं असें सांगतों कीं गरजे पुरता त्याचा उपयोग करुन स्वीकार करावा. अविचारानें त्यांतच गढुन बसुं नये. ॥२२०॥