चित्रदीप - श्लोक ६१ ते ८०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


लोकवचनार्थ आपल्या पक्षांस श्रुति प्रमाण आहे असेंदाखविण्याकरितां ते "सवाएष पुरुषोन्नरसमय" इत्यादिक श्रुतिवाक्यें देऊण विरोचनविसिद्धांतांचा आनुवाद करितात ॥६१॥

ह्मा लोकातांचेच आणखी दुसरें बंधु असें म्हणतात की, ज्याआधीं प्राण गेला म्हणजे हें शरीर नाशाप्राप्त पावते त्या अर्थीं ह्मा शरीराहुन आत्मा कोणी निराळा असावा ॥६२॥

हा देहाहुन भिन्न आत्मा त्यांच्या मतें इंद्रियासमुह होय कारण मी बोलतों, पाहतों, ऐकतो असे मनुष्य म्हणतो, त्यावरुन इंद्रियेंच आत्मा असें ते ह्मणतात ॥६३॥

ते यावर असें प्रतिपादन करितात की श्रुतीमध्ये इंद्रियामध्ये भांडण लागलेलें दिसुन येतें यावरुन त्यांस चैतन्य असलेंच पाहिजे ज्यापेक्षां चैतन्य आहे, त्यापेक्षात्यांना आत्मत्वसिद्ध झालें ॥६४॥

प्राणात्मवादी जे हैरण्यगर्भ यांचे ह्माणणें असे कीं मनुष्य जिवंत असण्यास इंद्रियाची गरज नाही कारण नेवादि इंद्रियाचा नाश झाला तरी प्राण असेपर्यंत तो जाणतो ॥६५॥

मनुष्य निजला तरी प्राण जागृतच असतो, प्राणाचें श्रेष्ठत्व श्रुतींत वर्णिलें आहे. प्राणमय कोशाचें वर्नन वेदांतिस्तारेंकरुन केलें आहे. ॥६६॥

दुसरें कित्येक उपासना करणारे लोक असें म्हणतात कीं, ज्या अर्थी प्राणास भोक्तेपणा नाहीं हें स्पष्ट आहे. त्या अर्थी भोक्तु जें मन तोच आत्मा होय ॥६७॥

ह्मास प्रमाण "मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो; हा गीतेतील श्लोक ह्माचा अर्थ मनुष्याच्या बंधमोक्षास कारण मनच आहे, शिवाय श्रुतीमध्यें मनोमय कोशाचें वर्णन आहेच त्या अर्थी मनच आत्मा असेंसिद्ध होते ॥६८॥

क्षणिक वादी ( बौद्ध) असें ह्माणता कींविज्ञान ह्माणजें बुद्धि ती मनाचे मुळ आहे ह्माणून बुद्धि हाच आत्मा ॥६९॥

याची सिद्धि अशी कीं अंतःकरणाचे भाग दोन, एक अहंवृत्ति आणि दुसरी इंदवृत्ति, एथें अहंवृत्ति हें विज्ञान आणि इंदवृत्ति हें मन ॥७०॥

मीपणाचा प्रत्यय आल्यावांचुन बाहेरचें जग आम्हाला कदापि समजणार नाही, ह्माणुन इंदवृत्तीचें बीज अहंवृत्ति आहे ॥७१॥

ज्या अर्थीं ह्मा अहंवृत्तीस क्षणोक्षणीं जन्म आणि नाश आहेत त्या अर्थी विज्ञान हें क्षणिक आहे आणि ते स्वयंप्रकाश आहे ह्माला तर दुसरें प्रमाणच नको. ॥७२॥

ह्माविषयी वेदांचें प्रमाण विज्ञानमय कोश जोश्रुतीत सांगितला आहे तेंच आहे कारण सुखदुःखादि सर्व संसार यालाच आहे. ॥७३॥

विज्ञान हें विद्युल्लता अभ्र आणि निमेष यासारखें क्षणिक आहे ह्मानुन याला आत्मा ह्माणतां येत नाहीं बरे, त्यावांचुन पाहुं गेल्यासदुसरें कोणी दिसत नाहीं ह्माणुन शुन्यच आहे असें माध्यमिक ह्माणतात ॥७४॥

ते आपल्या पक्षास असदेवेदमग्न असीत इत्यादिक श्रुतीचेंप्रमाण सांगतात ज्ञानज्ञेयात्मक सर्व जग तरकेवळ भ्रांतिच आहे ॥७५॥

मुळ अधिष्ठानावांचुन भ्रांति होणें अशक्य आहे ह्माणुन आत्म्यांचे अस्तित्व मानलें पाहिजे म्हणुन शुन्यवादी जो आहे त्याणेही आत्म्यांचे अस्तित्व कबुल केलें पाहिजे नाहीं तर शुन्य आहे असे समजणारा कोणी असल्यांवाचुन तसें बोलणेच संभवणार नाहीं ॥७६।

विज्ञानमयाचे आंत दुसरा एक आनंदमय जो कोश तो आत्मा असा वैदिक सिद्धांत आहे ॥७७॥

हीं जशीं आत्म्याच्या स्वरुपाविषयीं निरनिराळ्या लोकांची निरनिरळी मतें आहेत तशींच त्याच्या परिमाणाविषयींही आहेत. कोणी आत्मा अनु ( लहान ) म्हणतात. कोणी महान म्हणतात आणि कोणी मध्यम म्हणतात याप्रमाणें श्रुतींचे व युक्तींचे एकदेशी साहाय्य घेऊन नानाप्रकारे वाद करितात ॥७८॥

अणुवाद्यंस अन्तराल असें म्हणतात ते म्हणतात कों ज्या अर्थी एका रोमाच्या सहस्त्राव्या भागा इतक्या सुक्ष्म नाडीमध्ये आत्म्याच्या संचार आहे त्या अर्थीं आत्मा अणुरुप आहे ॥७९॥

यास श्रुतींतील प्रमाण असें देतात कीं "अणोरणीयान " ( लहानाहुन लहान ) "एषोऽणु" ( हा अणु आहे ) "सुक्ष्मात सुक्ष्मातरं" ( सूक्ष्माहुन अतिसुक्ष्म ) इत्यादिक शेंकडों हजारों श्रृति आहेत. हीं अणुवांद्यांची प्रमाण होता ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP