तृप्तिदीप - श्लोक १०१ ते १२०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


सर्व वेदांतातील वाक्यांचे पर्यवसान ब्रह्मारुप जो प्रत्यगात्मा त्यावरच आहे. असा जो बुद्धीचा निश्चय होणें त्यालाच श्रवण असें म्हणतात ॥१॥

हें श्रवण व्यासांना शारीर भाष्यांचा पहिल्या समन्वय अध्यायांस सांगितलें आहे. आणी दुसरे अध्यायात मनांचे समाधान करणार्‍या नानाप्रकारच्या तर्क युक्त सांगुन आर्थसभावानारुप मनन सांगितलें आहे ॥२॥

अनेक जन्मांच्या दृढाभ्यासांने देहादिकांचेठायीं पुनः पुनः आहे बुद्धि आणि जगाविषयीं सत्वत्व बुद्धि होते. हीच विपरीत भावना ॥३॥

मनाचें ऐकाग्र्य केल्यानें ही विपरीत भावना नाहींशी होते ते एकाग्र्य तत्वोपदेशापुर्वीच सगुन ब्रह्मापासनेनेआं होतें ॥४॥

वेदांत शास्त्रांत उपासनेचा विचार सांगितला आहे. पुर्वी ज्यांनी एकाग्र्याचा अभ्यास केला नाहीं त्यांना तें मागुन ब्रह्माभ्यासाच्या योगानें प्राप्त होतें ॥५॥

सर्वदां ब्रह्मातत्वाचेच चिंतन त्याचेंच कथन, त्याचाच परस्परांस बोध, व त्यावांचुन दुसरा विषयच नाहीं, असा जो अभ्यास त्यास ब्रह्माभ्यास म्हणतात ॥६॥

श्रुतीत असें असें सांगितलें आहे कीं त्या आत्म्याचें ज्ञान झाल्यावर धीर मुमुक्षुनें तेंच तत्त्व बुद्धीत ठसवावें बहु शब्दजल्पनानें वाणीला शीण मात्र होतो. म्हणुन फार बोलुं नये. ॥७॥

'जे लोक अनन्य भावेंकरुन माझ्या स्वरुपाचें ध्यान करुन माझी उपासना करितात त्या भक्तांचा सतत योगक्षेम मी चालवितों या गीतावाक्याचेंहीं तात्पर्य हेंच आहे ॥८॥

याप्रमाणें श्रुतिस्मृतीमध्यें विपरीतभावनानिवृत्यर्थ आत्म्याचेठायीं चित्ताची एकाग्रता सांगितली आहे ॥९॥

जी वस्तु जशी आहे तशी न समजतां अन्य प्रकारें समजणें यालाच विपरीतभावना म्हणतात . उदाहरण बाप आई, बंधु इत्यादिकांस शत्रुबुद्धिनें पाहणें ही विपरीत भावना आहे. ॥११०॥

हें विपरीत भावनेंचे लक्षण प्रकृत विषयांस बरोबर लागु पडतें आत्मा देहादिकांपासुन भिन्न व जग मिथ्या असुन देहच आत्मा आणि जग सत्य असं आम्हीं विपरीत मानतो. ॥११॥

ही विपरीत भावना खर्‍या तत्वाच्या भावनेच्या योगानें नाश पावते. यास्तव आत्मा देहाहुन भिन्न आहे. व जग मिथ्या आहे या गोष्टीचामनामध्यें निरंतर खल करावा ॥१२॥

याजवर असा एक प्रश्न आहे कीं देहापासुन आत्म्याचें भिन्नत्व आणी जगाचें मिथ्यात्व या खर्‍या तत्त्वाची भावना करावी म्हणुन वर सांगितले. ही भावना काम, जप, मंत्र, किंवा मूर्तिध्यानाप्रमाणें नियमानें केली पाहिजें. कीं कशीही केली तरी चालेल ? ॥१३॥

उत्तर त्यास नियमाची गरज नाहीं कारण भोजनाप्रमाणें त्या भावनेचें फळ प्रत्यक्ष आहे. जपाप्रमाणें भोजनांत नियम कोणीही राखीव नाहीं ॥१४॥

मनुष्य भुक असेल तर जेवतो, नसेल तर जेवीत नाहीं. कदाचीत जेवला तरी अमुकच नियम धरुन तो जेवतो असें नाहीं कोणत्याही प्रकारें तो आपल्या क्षुधेंचे निवारण करितो. नियम परलोकाकरितां आहेत. क्षुधा घालविण्यास त्याची गरज नाही. ॥१५॥

परंतु जपाचा प्रकार तसा नाहीं तो नियमानेंच केला पाहिजे. तसा न केल्यास प्रत्यवाय आहे. आणी भलत्यारीतीनें केल्यास स्वरवर्णाचा विपर्यय होऊन त्यापासुन अनर्थप्राप्ति होते ॥१६॥

वर सांगितलेली विपरीत भावना क्षुधेप्रमाणें प्रत्यक्ष बाधा करणारी आहे म्हनुन तिच्या अनुष्ठानाला अनुकच क्रम नाही. कोणत्याही उपयेंकरुन तिचा नाश केला म्हणजे झाले. ॥१७॥

जो उपाय आम्हीं सर्वदा आत्मचिंतन कथनरुप पुर्वीच सांगितला आहे तदेक परत्व म्हनुन आह्मी ब्रह्माभ्यासांत सांगितलें त्याला ध्यानासारखा निर्बंध नाही. ॥१८॥

दुसरीं कोणतीही कल्पना मध्यें आड न येतां एक सारखी एकाच मूर्तीची जी भावना तिला ध्यान म्हणतात मन अतिशय चंचल असल्यामुळे ध्यानाला निर्बंध अवश्य आहे. ॥१९॥

मनाच्या चंचलतेविषयीं गीतेंत अर्जुनानें असंम्हटलें आहे कीं हें कृष्ण हें मन इतकें चंचल, हट्टी व ओढ घेणारें आहे कीं त्याचा निग्रह मला वायुनिग्रहाप्रमाणें कठिण वाटतो. ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP