"ब्रह्मावित ब्रह्मावै भवति ही श्रुति ध्यानी घेऊन तो ब्रह्माचेंच चिंतन करितो दुसरें करीत नाहीं. ॥४१॥
ज्यांना देव व्हावें अशी इच्छा आहे ते जसे गंगेंत किंवा अग्रींत प्रवेश करितात त्याप्रमाणें चिदाभासही साक्षित्ववेंकारुन आसण्याची पक्की खात्री असल्यानें तो आपल्या नाशाची इच्छ करतो ॥४२॥
ज्याप्रमाणे अग्निप्रवेश केलेल्या मनुष्याचा मनुष्यपणा त्याचा देह जळेपर्यम्त नाहींसा होत नाही; त्याप्रमाणें प्रारब्धकर्माचा क्षय होऊन देहपात होईपर्यंत जीवत्वव्यवहार जात नाहीं ॥४३॥
ज्याप्रमाणे हा सर्प नव्हे ही दोरी आहे असे ज्ञान झाल्यावर देखील पुर्वीच्या भीतीपासुन उप्तन्न झालेले कंपादिक अंगदें बंद होण्यास कांहीं वेळ लागतो. त्याप्रमणें भोगादिक हीं हळुहळु बंद होतात आणि ज्याप्रमाणें तो दोरी पुनः अंधारीत टाकली असतां पुनः सर्पासारखी भासते, तसें ज्ञान जाहल्यावरदेखील चिदाभासास मी मनुष्य अशी विपरीत प्रतीति केव्हा केव्हा होते ॥४५।
तथापि तेवढ्या दोषामुळे तत्त्वज्ञानास धोका मुळींच नाहीं. कारण जीवन्मुक्ति हें कांहीं व्रत नाहीं तर ती केवळ वस्तुची खरी स्थिति आहे ॥४६॥
पुर्वी जो दशमाचा दृष्टांत दिला आहे तेथेंही ही गोष्ट अनुभवास य्ते तोदशम जी दशम आहे असें समजतांच रडणें मात्र सोडुन दोतो परंतु त्या दुःखाने कपाळ आपटुन जो त्याणें जखम करुन घेतली ती तत्काळ बरी होत नाही. ती बरीहोण्यास कांहीं दिवस पाहिजेत ॥४७॥
आतां त्या व्रणाचें दुःखत्याला कांहीं दिवस भोगावें लागेल खरें; तथापि " मी दहावा सांपडलों" या ज्ञानानें त्याला हर्ष झाला त्या खाली तेंसर्व दुःख गडप होते त्या प्रमाणें मुक्तिलाभ झाला असतां प्रारब्धानें होणारेंदुःख हा हर्षखालें कांहींच वाटत नाहीं ॥४८॥
जीवनमुक्ति ज्या अर्थी व्रत म्हणतां येत नाही त्या अर्थी भ्रम झाला कीं पुनः पुनः विवेक करावा जसा रस सेवन करणारा एकाच दिवशी वरचेवर खाऊन क्षुधा घालवितो ॥४९॥
त्या दशमा दशमाचे कपाळाची खोंक जशी औषधानेंच बरी होते त्याप्रमाणेंच भोगानेंच प्रारब्धाचा क्षय होतो ॥५०॥
एथर्पर्यंत किमिच्छन इत्यादिक वरील श्रुतीच्या उत्तराधीनें शोकनिवृत्ति जी चिदाभासाची सहावी अवस्था ती आह्मी सांगीतली आता सातवी अवस्था सांगतो ॥५१॥
तृप्ति दोन प्रकारची विषयलाभपासुन जी तृप्ति होते तिला नाश आहे म्हणजे तेथें आशेचा अंकुर पुनः राहतो म्हणुन तिला आम्हीं सांकुश असें नाव ठेवितों परंतु जीवन्मुक्तांची तृप्ति तशी नाही. ती एकदां झाली म्हणजे तिचा नाशच होत नाही. म्हणुन तिला निरंकुश अशी संज्ञा आहे. आत्मज्ञानानें मनुष्यास असें वाटतें कीं मीं करावयांचे तें केलें आणि मिळवायाचें मिळविलें ॥५२॥
ज्ञात्याला तत्वज्ञान होण्यापुर्वी ऐहिक म्हणजे या लोकीं सुखप्रात्पि आणि दुःखनिवृत्तिकरितां कृषी वाणिज्य इत्यादिक व आमुष्मिक म्हणजे स्वर्गलोकप्राप्तिकरितां यज्ञ व उपासनादिक व मोक्षसाधन जें ज्ञान त्याच्या प्राप्तीकरतां श्रवण मनन निदिध्यासनादिकः या प्रकारेंकरुन बहुप्रकारचें कर्म कर्तव्य होतें आणि आता तर त्यास संसारसुखाची इच्छा नाहीं म्हणुन व ब्रह्मानंद साक्षात्काराची सिद्धि झाली आहे म्हणुन तें सर्व त्यानें केल्यासारखेंच आहे आतां त्याला कांही कर्तव्य उरलें नाहीं ॥५३॥
याप्रमाणें पुर्वी ची स्थिती आठवुन आपले कृतकृत्यत्व नित्य मनांत आणुत तो नित्यतृप्त राहतो ॥५४॥
तो आपली धन्यता याप्रमाणें मानतों. अज्ञानी लोक दुःखी होत्सातें पुत्रादिकांची अपेक्षा करुन संसार करणारा तर करेत ना बापडे मी परमानंदानें पुर्ण असल्यामुळे मला कोणतीच इच्छा नाही. मग मी संसार कशास करुं ॥५५॥
ज्यांना परलोकीची इच्छा असेल ते यज्ञदानादिक कर्मे खुशाल करोत मी सर्व व्यापक असल्यामुळे मीनाहें असा लोकच नाही; मग ती कर्मे घेऊन करावयाची काय ? ॥५६॥
जे अधिकारी असतील त्यांणी वेदशास्त्रें खुशाल पढावी व पढावावींत मी मुळींच अक्रिय झालों मग मला अधिकार कुठला ? ॥५७॥
निद्रा भिक्षा, स्नान , शौच इत्यादिक कर्में मी इच्छातही नाहीं व करितही नाहीं जवळच्या पाहणारांना मी कर्में करितासें वाटेल तर वाटेना बापडें त्यास तसें वाटल्यानें मला काय होणार ? ॥५८॥
ज्याप्रमाणें गुंजांच्या राशीस दुसर्यानीं अग्नि म्हतल्यानें ती जाळूं सकत नाहीं त्याप्रमाणे मी संसार करितों असे दुसर्यांनीं म्हतलें तरी त्याचा स्पर्श मला लागत नाही. ॥५९॥
ज्यांना ब्रह्मातत्त्व समजलें नाहीं तें खुशाल श्रवण करोत मला तें तत्त्व पक्कें समजल्यावर मी तें कां करावें ? तसेंच आत्मस्वरुपाविषयीं ज्यांच्या वारंवार संशय येतात त्यांणी मनन करावें माझें ज्ञान निःशंयय झाल्यावर मला त्यांचे काय प्रयोजन ? ॥२६०॥