ज्याला देहात्मा बुद्धि वारंवार होतो त्याणें निदिध्यास करावा मला तसा विषर्यय मुळीच होत नाही. मग निदिध्यासाची खटपट तरी कशाला ? ॥६१॥
आतां मी मनुष्य असा केव्हां केव्हां व्यवहार घडतो परंतु तो विपर्यासामुळे नव्हें त्यांचेंकारण अनेक जन्माचा संस्कारच होय ॥६२॥
प्रारब्ध कर्माचा क्षय झाला म्हणजे हा व्यवहार आपोआप नाहींसा होतो परंतु त्या कर्माचा क्षय न होतां आम्हीं शेकडों वर्षें ध्याअ केलें तरी तेंव्यर्थ आहे ॥६३॥
आतां व्यवहाराचा अडथळा झाल्यामुळे तो कर्मी व्हावा अशीं ज्याला इच्छा असेल त्याणें खुशाल ध्यान करावें पण मला जर त्याला मुळीच अडथळा वाटत नाहीं तर त्यांची मला काय गरज आहे ॥६४॥
मनांत मध्यें मध्ये विक्षेप येतो, तो न यावा म्हनुन समाधि लावावयाचा तो विक्षेपच जर माझा गेला तर तो समाधि तरी कशाला पाहिजे कारण विक्षेप आणि समाधि हे दोन्हीं मनाचेच धर्म आहे आणि मला तर तें मन मुळीच नाहीं , मग विक्षेप कोठुन असणार ? ॥६५॥
आतां अनुभव येण्याकरितां समाधि करावा असें जग म्हणावें तर मीच अनुभवारुप आहे मग मला दुसरा आणखी अनुभव तो कोठुन व्हावा ? जें करावयाचें तं मीं केलें. आणि मिळवयांचें तें मिळविलें असा माझा पक्का निश्चय झाला आहे. ॥६६॥
माझा व्यवहार प्रारब्धानुरुप कसातरी चालो, मग तो लौकिकी असो किंवा शास्त्रीय असो कसाही असो मी स्वतःअकर्ता असुन मला कर्माचा मुळींच लेप नाहीं ॥६७॥
किंवा मी जरी कृतकृत्य झालों; तरी लोकांनी मला पाहुन चांगल्या रीतीनें आचरण करावें या हेतुनें शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें मी वागेन त्यांत तरी माझ काय तोटा होणार ? ॥६८॥
हें माझें शरीर देवाची पुजा करो स्नान करो; शौच भिक्षादि कर्में करो; ही माझी वाणी प्रणवाचा जप करो; किंवा उपनिषदाचें अध्ययन करो ॥६९॥
तशीच माझी बुद्धि विष्णूचें ध्यान करो, किंवा ब्रह्मानंदी लीन होवो; मी तर सर्वांचा साक्षी आहे मी कांहीं करीत नाही आणि करवीतही नाहीं ॥२७०॥
याप्रमाणें कर्मठ व ज्ञानीं यांचे विषय पुर्वा पर समुद्राप्रमाणें एकमेकांपासुन अगदी भिन्न असल्यामुळे त्या दोघांच्या कलहासकारणच उरलें नाहीं ॥७१॥
कर्मठाचा विषय देह वाणी आणि बुद्धि या तिहींमध्यें काय तो आहे साक्षीकडे त्याचा कांहीं संबंध नाही आणि ज्ञानाच्या विषय साक्षी चें अलेपत्व हाच आहे. त्यांना देहादिकांकडे जाण्याची गरज नाहीं ॥७२॥
असें असुन परस्परांविषयीं गैर समजुन होऊन बहिर्याप्रमाणें ते व्यर्थ कलह करितात शाहणा जो आहे तो त्या कलहांत शिरत नाहीं. उगीच पाहुन त्यांचे वेडेपणास हंसतो ॥७३॥
ज्या सांक्षींचें ज्ञान कर्मठ पुरुषास मुळींच नाहीं तो साक्षीं ब्रह्मा आहे असें तत्त्ववेत्ता समजत असेल तर त्यांत कर्मठांचे काय गांठोडे जातें ? ॥७४॥
तसेंच ज्ञान्यानें जी देह वाणी बुत्धि इत्यादि हीं सर्व खोटी म्हणुन मुळीच सोडुन दिलीं त्यांच्या साहाय्यानें कर्मठ पुरुष कर्म करील तर त्यात ज्ञान्याचें तरी काय जातें ? ॥७५॥
आतां ज्ञान्याला कर्मांचे प्रयोजनच नाही;तर त्यांची कर्माविषयीं वृत्ति कां असावी ? असें कोणी पुसेल तर त्याला आम्हीं उलट पुसतों की, त्यांचेठायींत्याला निवृत्ति तरी कां असावी ? ज्ञानाकरितां निवृत्ति पाहिजें असें तो म्हणाले तर जिज्ञासेकरितां प्रवृत्तिही पाहिजे असें आम्हां म्हणतो ॥७६॥
ज्ञान झाल्यावर जिज्ञासा कशी राहील असें तो म्हणेल तर एकदां ज्ञान झाल्यावर पुनः कसचें असें आम्हीही विचारतों ज्ञान स्थिर राहण्याला तें निःसशंय झाल्यावर द्सर्या साधनांची जरुर नाहीं ॥७७॥
या ज्ञानाची बाधा करण्यास अविद्याही समर्थ नाही व तिचें कार्य जें जगत तेंही समर्थ नाही. कारण पूर्वीच तत्त्वबोधानं त्यादोन्हींचाही समग्र नाश झालेला आहे ॥७८॥
आतां हें बाधित द्वैत डोळ्यांना दिसलें तरदिसेना बापडें. तेणेकडुन ज्ञानाला मुळींच धक्का नाही. जिवंत उंदीर जर माजराला मारण्यास समर्थ नाही तर मेलेला उंदीर त्याला कसा मारील ? ॥७९॥
जो पाशुपतास्त्राला देखील दाद देत नाही. त्याच्या अंगाला निष्पळ बाणांनी काय होणार ? ॥२८०॥