अशा प्रकारचा भोक्ता पतिजायादी विषयांची जी इच्छा करितों ती केवळ आपल्या सुखाकरितां अशी जी प्रसिद्धि आहे तिचाच अनुवाद श्रुतीनें केला ॥१॥
असा अनुवाद करण्याचें कारण हेंच कीं मनुष्याचे विषयांवरील प्रीति जाऊन स्वतःवर बसावी. कारण पतिजायादि असर्व आपल्या सुखाची साधनें आहेत ॥२॥
याविषीं पुराणांत एक वचन आहे तें असें की हे देवा अविचर्याची जशी विषयांवर सदा प्रीति असते. तशीच तुजवर माझी सदा प्रीति असो आशी एका भक्तानें प्रार्थना केली आहे ॥३॥
या न्यायाने विरक्त मुमुक्षु पुरुष सर्व भोगण्याचे विषयांपासुन आपली प्रीति ओढुन घेऊन आपल्यावर आणुन ठेवितो. आणि आत्म्यास जाणण्याची इच्छा करितो ॥४॥
जसा संसारीं मनुष्य स्त्रक चंदन वधु वस्त्र सुवर्नादिकांच्या ठायीं दक्ष असतो तसा मुमुक्षु भोक्त्याचेठायीं ( आत्म्याविषयीं ) दक्ष असतो ॥५॥
व ज्याप्रमणे सभा जिंकण्याच्या इच्छेनें पंडित लोक काव्य नाटक तर्कादि शास्त्रांचा निरंतर अभ्यास करितात त्याप्रमणे मुमुक्षुनें स्वतःविषयीं विचार कारावा. ॥६॥
तसेंच ज्याप्रमाणें कर्मठ पुरुष स्वर्गादिकांची वांच्छा धरुन जपयज्ञ उपासनादि कर्मे मोठ्या श्रद्धेनेम करितो, त्याप्रमाणें मनामध्ये मुमुक्षा धारआण करुन साधकानेंस्वतःवर श्रद्धा ठेवावी ॥७॥
तसेंच योगी हा अणिमादिक सिद्धींची इच्छा करुन जसा हटानें चित्तनिग्रह करितो, त्याप्रमाणें साधकांने मुमुक्षा धारण करुन स्वतःचे विवेचन करावें ॥८॥
त्या पंडितादिकांची आपपल्या विषयांमध्यें अभ्यासाबलानें जशे आधिकाधिक गती होते त्याप्रमाणें साधकांचाही अभ्यास बलानें देहादिकापासुन मी निराळा आहे असा विवेक अधिकाधिक स्पष्ट होत जातो ॥९॥
या विवेकाचा परिणाम शेवटी असा होतो कीं ? भोक्त्यांचे खरें स्वरुप जागृदादि तिन्हीं अवस्थामध्यें अन्वयव्यतिरेकांहींकरुन निवडल्याने साक्षीं हा असंग आहे असा निश्चय होतो ॥११०॥
ते अन्वयव्यातिरेक असे जागृत्स्वप्न सुषुप्ति यांपैकी ज्या ज्या दर्शेंत जें जें साक्षीत दिसतें तें तें त्या त्या दशें पुरतेंच म्हणजे जाग्रुतीतील स्थुल सृष्टी जागृतींतच स्वप्नातील सुक्ष्म सृष्टि स्वप्नातच. आणी सुषुप्तीतील अज्ञान सुषुप्तीतच असा अनुभव सर्व लोकांस आहे ॥११॥
याविषयीं श्रुतीचिहीं प्रमाण आहे "स यत्तत्रक्षत्रें " इत्यादिक श्रुतीचा अर्थ असा आहे कीं त्या त्या आवस्थेत साक्षीच्या दृष्टीस जें जें पुण्य व पाप पडतें त्या पासुण तो अगदी निराळा असतो ॥१२॥
दुसरें प्रमाण जागृत्स्वप्रसन्नषुतीचेठायीं असणारा प्रपंच ज्या ब्रह्माच्या योगानें प्रकाशित तें ब्रह्म मी ज्ञान झालेंअ असतां प्राणी सर्व बन्धापासुन तत्काल मुक्त होतो ॥१३॥
तिसरें तिन्हीं अवस्थामध्यें एकच आत्मा आहे असें समजावे तीनहीं अवस्थापासुन निराळा असणारा जो साक्षी त्यास पुनर्जम नाहीं ॥१४॥
चवथें त्या तिन्हीं आवस्थेंत भोग भोक्ता आणि भोग्य या त्रिपुटीपासुन निराळा चैतन्यरुपी साक्षी सदाशिव मी आहे ॥१५॥
याप्रमाणे आत्मतत्वाचें विवेचन केलें असतां ज्याला विज्ञानमय अशी संज्ञा आहे असा जो चिदाभास तो विकारी असल्यामुळे भोक्तृत्व त्यालाच लागु होतें ॥१६॥
हा चिदाभस खोटा आहे असें श्रुतिप्रमाणावरुन व अनुभवानेंसिद्ध होतें कारण जग हें इम्द्रजालाप्रमाणें मिथ्या आहे असे पुर्वी सांगितलेंच आहे आणि चिदाभासही जगापैकींच आहे ह्माणुन तोही मिथ्या म्हटला पाहिजे ॥१७॥
या चिदाभासाचा लय झालेला सुषुत्यादि अवस्थामध्यें अनुभवास येतो. अशा विचारानें आपल्या खोटेपणा मुमुक्षु वारंवार समजुन घेतो . ॥१८॥
याप्रमणें आपला खोटेपणा समजुन घेऊन आपला खचित नाश होणार आहे. असें जाणन पुनः भोगाची इच्छा करीत नाहीं ठीकच आहे. मरणास टेंकलेला मनुष्य विवाहाची इच्छा कधीं तरी करील काय ? ॥१९॥
मग मी भोक्ता म्हनुन पुर्वी जसा व्यवहार करीत होत तसा पुनः करण्याला नाक कापलेल्या मनुष्याप्रमाणें तो लाजतो आणि मनांत खंत बाळगुन प्रारब्ध निमुटपणें भोगतो ॥२२०॥