समर्थहंसाख्यान - मंगलाचरण

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


गुरुशिष्यपरंपरागत हंसांचा जीवनवृतान्त

नारायणं पद्मभवं वसिष्ठं श्रीरामचन्द्रं कृतिभूसमर्थ ।

श्रीउद्धवंमाधवनामशिष्यं श्रीरुद्रराम वरनागनाथम् ॥

श्रीलक्ष्मणं ब्रह्माविदां वरिष्ठं तच्छिष्यनारायणहंसराजं ।

तेषां परान्बालकराममुख्यांश्चतुरश्च शिष्यानह्मानतोऽस्मि ॥

जय जय सद्‍गुरु परमहंसा । सच्चिदानंदघन परेशा । सर्वांतरहृदयनिवासा । निर्विकारा ॥१॥

सद्‌गुरुशब्दें ब्रह्मा अमूर्त । जें का मायाउपाधिरहित । तेंचि मायावशें मूर्तिमंत । परम हंसरूपें ॥२॥

एक निर्विकारचि परिपूर्ण । तेथें नसोन जालें स्फुरण । तेंचि जाणीजे दोनीपण । हंस आंणि हंसदास ॥३॥

हंसरुपें सद्‌गुरु तो विशेष । हंसदास तोचि सत्शिष्य । उभयांचें लक्ष्य तें अविनाश । उपाधि निरसतां ॥४॥

मिथ्याचि अविद्या उभी केली । तयेस्तव शिष्यें व्यक्ति धरिली । जेधवा सुविधा अधिष्ठिली । तेव्हा गुरुत्व उमटे ॥५॥

शिष्यास्तव जाला श्रीगुरु । कीं गुरुस्तव शिष्य साकारु । हे एकमेंकां साहाकरु । एकच म्हणोनी ॥६॥

जेवि समुद्रास येतां भरती । तेणें खाड्याही पूर्ण होती । मागुती समुद्रीं सामावती । ओहोट होतांचि ॥७॥

तैसा गुरुबोध उचंबळतां । तेणें दाटती शिष्यसरितां । मागुती शिष्यरूपा ऐक्याता । गुरुचित्सागरीं ॥८॥

तयांसी दोनी न म्हणावें । एकरूप गुरुशिष्यनांवें । सेव्य सेवक तरी दिसावे । सुखग्रहणामुळें ॥९॥

तेथें वेगळीक जरी असती । तरी शिष्याची केवी गुरुत्वप्राप्ति । शिष्य तरी सद्‌गुरुप्रसादें ॥१०॥

दोनीपणावांचून । सुखाचें नव्हें ग्रहण । यास्तव धरूनि शिष्यपण । आपण आपणा सेविती ॥११॥

गुळाचाचि केला । गणपति नैवेद्य समर्पिती । तैशिया गुरुशिष्य दोनी व्यक्ति । एकपणा न मोडतं ॥१२॥

असो हंस आणि हंसदास । एकरूपचि गुरु शिष्य । तया परंपरेचा विलास । बोलिजे यथामति ॥१३॥

ऐकतां गे गुरुपद्धति । अनाधिकारिया अधिकारप्राप्ति । तेही साधनें हंस होती । हंसदास्यत्वें ॥१४॥

आतं ऐका सावधान । हंसपरंपरेचें लक्षण । येथें मुख्य आदिनारायण । तेथुनी ओघ चालिला ॥१५॥

निर्विकार ब्रह्मा परिपूर्ण । अखंडैकरस दंडायमान । तेथें उगीच जाली आठवण । अहंब्रह्मास्फूर्ति ॥१६॥

तोचि आदिनारायण । आदि गुरु सनातन । तेथूनि प्रगटले गुण तीन । ब्रह्मा विष्णु माहेश ॥१७॥

प्रलयोदकीं कमल उद्धवलें । ब्रह्मा बाळक तेथें खेळे । नेत्र उघडून पाहुं लागलें । तव अंसभाव्य पाणी ॥१८॥

मी कोण कैसें जग करूं । ऐसा पडिला जेव्हां विचारु । तेव्हां तप तप हे दोनी अक्षरु । ध्वनि मात्र उठली ॥१९॥

ऐसा होतांचि स्फूर्तिभाव । ज्ञान पावला ब्रह्मादेव । परि तो रजोगुणाचा स्वभाव । तेणें मागुती विसरला ॥२०॥

सनत्कुमारें पुशिलें । तेव्हां ब्रह्माया ठक पडीलें । तेधवा हंसरूपें येणें केलें । विष्णु आदिनारायणें ॥२१॥

ब्रह्मा बांधें जागविला । कुमाराचा प्रश्न फेडिला । येणें रीती गुरु जाला । हंसरूपें विष्णु ॥२२॥

एवं आदिनारायण मुख्य गुरु । तेथून हंसरुपें विष्णु सद्‌गुरु । पुढें ब्रह्मा उपदेशप्रकारु । वसिष्ठ करिता जाला ॥२३॥

त्रेतायुगीं राम अवतार । वसिष्ठे पाहुनी थोर अधिकार । प्रबोधिलें ज्ञान साचार । तेणें राम पूर्ण जाहला ॥२४॥

कलियुगीं अंश मारुतीचा । सज्जन समर्थ नामें पकटे साचा । तया उपदेश श्रीरामाचा । होता जाला जन्मस्थानीं ॥२५॥

तया हंससमर्थें पाहोनि अधिकार । उद्धवा उपदेश केला साचार । पावोनि ऐक्यतेचें विढार । हंसरूपें विचरतु ॥२६॥

मग कृपेनें उद्धवस्वामी । बोध ठेविती माधवधामीं । तेणें बोधें असतां सर्व कर्मीं । अलिप्तत्वें तर्तें ॥२७॥

रुद्राराम अत्यंत भोळा । माधवस्मामीनीं देखोनि डोळा । बोधिते जाले ज्ञानसोहळा । तेणें ऐक्यपदवी पावे ॥२८॥

रुद्रारामकृपेनें तुष्टले । नागनाथासी उपदेशिलें । तेणें नागनाथ महाराज जाले । विख्यात भुवीं ॥२९॥

लक्ष्मण नामें देखोनि अधिकारी । उपदेश केला कर्णपात्रीं । तेणें सुखें असतां संसारीं । ब्रह्मानंदें डुल्लत ॥३०॥

तया लक्ष्मगहंसाचे प्रसादें । नारायण ज्ञान पावला अभेदें । ऐक्यानंदें क्रीडत छंदें । द्वैत सर्व त्यागुनी ॥३१॥

प्रसाद नारायणहंसाचा । मनोरथ पुरे चिमणियाचा । सदा सोहळा ब्रह्मानंदाचा । अंतर्यामीं ॥३२॥

ऐसी हंसपद्धति हे गहन । तयासीं माझें अभिवंदन । जया सेवनें भवबंधन । तुटे हेळामात्रें ॥३३॥

अहंस्फूर्ति आदिनारायण । तोचि आदि गुरु परिपूर्ण । परंपरा ओघ जेथुन । देहेविण नमन तया ॥३४॥

व्यापक विष्णु परमहंस । जो परिपूर्ण अखंडैकरस । कैवल्यप्रद अविनाश । तंदेशें नमन तया ॥३५॥

तोचि नामरूपातें धर्ता । मायावशें सृष्टिविधाता । चतुर्मुख धरी व्यक्तता । तया स्वयंभूसी नमूं ॥३६॥

ऋषिमाजीं जो मंडण । आणि ज्ञानविज्ञानपूर्ण । वसिष्ठ जया नामाभिधान । साष्टांग नमन तया ॥३७॥

सूर्यवंशी रघुनाथ । जो अनाधारिया नाथ । आणि समर्थांचा समर्थ । साष्टांग वंदियेला ॥३८॥

अज्ञानकलि हा मातला । येथें ज्ञान प्रगटावया अवतार धरिला । सज्जन समर्थ हंसाला । नमन साष्टांगें ॥३९॥

बाळपणीं प्रपंचीं उदास । ब्रह्मानंदी ज्याचें मानस । उद्धवस्वामी सद्‌गुरु सामान्य ज्ञाप्ति । विशेषस्फूर्ति असेना ॥४०॥

हंस श्रीगुरु माधव । जो निजानंदाची ठेव । तो नमिलासे स्वयमेव । सहित साष्टांगेसी ॥४१॥

नमन श्रीगुरु रुद्रमूर्ति । केवळ अवतरली निज शांति । ज्ञानरूप सामान्य ज्ञाप्ति । विशेषस्फूर्ति असेना ॥४२॥

केवळ अवतरला परमार्थ । जो ज्ञानाविज्ञानसमर्थं । तो सद्‌गुरु हंस नागनाथ । तया साष्टांग नमोनमः ॥४३॥

मनोहरमूर्ति सलक्षण । सद्‌गुरु हंस लक्ष्मण । नमोनमस्ते सच्चिद्धन । साष्टांग भावें ॥४४॥

उद्धरावया जडजीवांस । पुनरपि अवतरे राजहंस । नारायणनामें परमहंस । तया सद्‌गुरूसी नमोनमः ॥४५॥

ऐसी हे हंसगुरुपद्धति । ज्ञानपरंपरा सहजगति । मंगलाचरणीं म्या यथामति । स्तविली असे ॥४६॥

आमुचा हा हंसमार्ग । परमार्था पाववी सवेग । उपदेशमात्रेंच असंग । विमल ज्ञान प्रगटे ॥४७॥

तया मार्गीं श्रीगुरुवर्य । वंद्य असती शंकराचार्य । जो प्रत्यक्ष ज्ञानसूर्य । साष्टांग नमन तया ॥४८॥

तैसाचि जगद‌गुरु श्रीदत्त । जो निवृत्त्यर्थ अवतार धरित । तयाचे चरणीं सदोदित । मस्तक माझें ॥४९॥

ग्रंथारंभी मंगलाचरण । केलें हंसप्रसादें कडुन । तेणें चिमण्या सप्रेम घन । गुरुमूर्तिध्यानें ॥५०॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरुपें ज्ञानभिव्यक्ति । प्रथमाष्टकीं मंगलकीर्ति । प्रथम प्रकरणीं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP