मूळस्तंभ - अध्याय ९

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

आतां विश्वावसुयुगपरवडी ॥ तें वर्षलें वर्ष दोन कोडी ॥ रचना रचली केवढी ॥ ती ऐक देवी ॥१॥

प्रथम क्रिया धर्माधर्म ॥ आणि धर्मवृत्ति नेम ॥ हे ब्रह्या रची धर्म ॥ पार्वती वो ॥२॥

तंव पार्वती म्हणे ईश्वरा ॥ क्रिया धर्माधर्म विस्तार सांगा बरा ॥ मग सविस्तर जराजरा ॥ कळेल मज ॥३॥

ऐसे पार्वतीने पुसिलें ॥ त्यांने देव संतोषले ॥ आणि सांगू लागले ॥ देवीप्रती ॥४॥

ब्राह्यण ॥१॥ क्षत्रिय ॥२॥ वैश्य ॥३॥ शूद्र ॥४॥ हे चारी वर्ण उत्तम पवित्र ॥ ह्यांची वर्तणूक विचित्र ॥ परिस देवी ॥५॥

हे सर्वही चारी वर्ण ॥ आचरणेंचि होती आपण ॥ तें ऐक हो देवी वचन ॥ कवणेपरी ॥६॥

क्रिया म्हणजे सदाचारु ॥ हा ब्रह्यकर्माचा विचारु ॥ हा अनुभव घेईजे निर्धारु ॥ नितु ब्रह्य मानसी ॥७॥

आतां क्षत्रियांचा धर्म जाण ॥ अखंड प्रपंचा कीजे संहारन ॥ प्रकृति राखणें आचार ज्ञान ॥ हा क्षत्रियधर्म ॥८॥

आतां वैश्ययातीसी उत्तमपण ॥ ब्रह्यज्ञान केलें पूर्ण ॥ लाभ तो आत्मत्व आपण ॥ हें आचरण वैश्याचे । \९॥

आतां कुक्ष करी देहविचारु ॥ गुरुमुखें काया क्षेत्र जो करीनकरु ॥ रचना दावी ईश्वरु ॥ हे चारी वर्ण ॥१०॥

हा विश्वावसुयुगाचा विचारु ॥ रचना दावी विचारु ॥ उपरी अधर्माचा विचारु ॥ रचिला कैसा पैं ॥११॥

भक्ति ती सर्व भावे भजन ॥ क्रिया म्हणिजे सदाचरण ॥ ज्ञान म्हणिजे सर्व कर्म निरसन ॥ हे शिवभक्ति ॥१२॥

ही चालवितां शिवभक्ति ॥ अनादि भरलें नेणों किती ॥ मग ते अनन्य वर्तती ॥ बाह्यात्कारें ॥१३॥

ते आत्मज्ञान विसरले ॥ तपें व्रतें तीर्थे दानें बरळले ॥ भक्ति पूजा ध्यान उपासनें भरले ॥ नानामार्गी ॥१४॥

सदाचार तप यज्ञादि वहिले ॥ हे नवविध धर्म रचिले ॥ मायाधर्मे लोक बांधिलें ॥ सकलही ॥१५॥

ऐसे हे धर्म चालवितां ॥ मी तंव राहिलों परता ॥ ऐसे लोक हे भ्रमतां ॥ अधोजतीत पडियेले ॥१६॥

मग धर्मातें करीं थोर ॥ दर्शनीं आरंभिला त्याचा विचार ॥ नानाषट्कर्माचा प्रकार ॥ आरंभिला तिहीम ॥१७॥

मग म्हणे पार्वती ॥ देवा षट्कर्मे कासया म्हणती ॥ मग शंकर सांगती ॥ श्रवण कीजे ॥१८॥

दर्शनें रचिलीं शास्त्रें ॥ तीं सत्य क्रिया धर्म पवित्रें ॥ परि नेणती अपवित्रें ॥ वर्तो तेवीं ॥१९॥

शास्त्रेंही कासया नाना ॥ ते ऐक देवी विवंचना ॥ या दर्शनांची रचना ॥ ब्रह्ययाची ॥२०॥

या शब्दयोगें तरिजे ॥ या शब्दाची रचना कीजे ॥ त्या नाम शास्त्र म्हणिजे ॥ पुराणादिकीं ॥ २१॥

तरी साच म्हणिजे क्रियाकर्म ॥ आणि तिसता वृत्तिनेम ॥ अधर्म तो पापकुकर्म ॥ जाण देवी ॥२२॥

ऐसे धर्माधर्म आपुले मती ॥ नाना कवि कवित्व करिती ॥ आणि पुराणें वाखणिती ॥ व्यासदिक ॥२३॥

ऐसी पापपुण्याची रीती ॥ ती शास्त्रें ऋषि रचिती ॥ मग ते लोक शास्त्रें आमुची म्हणती ॥ द्वैतभावें ॥२४॥

त्या शास्त्रें लोक चालती ॥ एक आमुचे शब्द वाढविती ॥ पापपुण्य डहुळती ॥ त्रिभुवनींचे ॥२५॥

ऐसीं यांची भांडणें ॥ नाना काव्य पुराणेम ॥ ऐसे भ्रमले अज्ञानपणें ॥ ते नेणती मज ॥२६॥

एक कुळक्रमेम भ्रमले ॥ एक नाना शास्त्रीं भ्रमले ॥ मजप्रती न पावती ठेले ॥ शास्त्र पुराणे ॥२७॥

एक कर्म धर्म आचरनेम ॥ हेंचि सत्य शास्त्र पुराणें ॥ एक धरुनि राहिलें मन ॥ जाण देवी ॥२८॥

ऐसी विश्वावसूची रचना ॥ देवी तुज केली श्रवणा ॥ धर्म अधर्म मूळस्थाना ॥ रवना जाहली ॥२९॥

मागिले युगीं वेदरचना जाहली ॥ यापासुनी साही दर्शनें केलीं ॥ त्यांपासूनि वहिलीं ॥ सहा लिंगे ॥३०॥

लिंगापासाव भक्ति रचिली ॥ तीं उपदर्शनें जाहलीं ॥ त्यांपासूनि वहिलीं ॥ उत्पत्ति नरकाची ॥३१॥

त्यापासूनि पापपुण्यें निपजली ॥ त्यापासाव धर्मकर्मे लागली ॥ ऐसी रचना प्ररर्तली ॥ विश्वावसु युगीं ॥३२॥

त्यापासूनि स्वर्ग नरक झाले ॥ मग सुखदु :ख निपजलें ॥ यास्तव जन्ममरण झालें ॥ ऐक देवी ॥३३॥

यास्तवचि सत्यासत्य जाहलें ॥ मग दर्शनें विवादले ॥ म्हणोन माझॆं स्वरुप अंतरले ॥ त्रिभुवनीं ॥३४॥

मग माझें स्वरुप नेणती ॥ मग अठरा जाति भ्रांति ॥ त्या भ्रमें गुंतोनि रमती ॥ जाण देवी ॥३५॥

मग चौ -यायशीं योनीप्रती जाती ॥ माझें स्वरुप न देखती ॥ आगम तर्के विवादती ॥ शास्त्रमार्गे ॥३६॥

एक आगम पाहोनि भुलले ॥ त्या तापें तापस झाले ॥ मग नेणतां प्रळय पावले । जन्ममृत्यूचा ॥३७॥

मग गणना आयुष्याची ॥ आणि झाली जन्ममरणाची ॥ येत जात कुळजातीची ॥ येरझारेंसी पात्र ॥३८॥

ऐसी विश्वावसुयुगींची रचना ॥ कर्म धर्म नेम जाणा ॥ ती सांगे भवानीकारण ॥ श्री महादेव पैं ॥३९॥

येथोनि विश्वावसुयुग संपूर्ण ॥ गौरीसी सांगे त्रिनयन ॥ पुढील युग सांगेन ॥ ईश्वर म्हणे ॥४०॥

इति श्रीशिवनिबंधे मूळस्तंभे शिवपुराणे ईश्वरपार्वतीसंवादे विश्वावसुयुगकथनं नाम नवमोऽध्यायः ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP