श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
आतां कलियुगवर्तमान ॥ सांगतों देवी तुजलागुन ॥ तें ऐक तूं चित्त देऊन ॥ पार्वती वो ॥१॥
कलियुग प्रमाण लक्ष चार ॥ आणि बत्तिस सहस्त्र संवत्सर ॥ ऐसा त्या कलियुगाचा प्रकार ॥ जाण देवी ॥२॥
त्या कलियुगाचा प्रारंभ जाण ॥ भाद्रपदमास पक्ष कृष्ण ॥ त्रयोदशी रविवारदिन ॥ तैं जाहला असे ॥३॥
त्या कलियुगामध्यें जाण ॥ आदिपुरुष श्रीनारायण ॥ भूमिभार फेडावयाकारण ॥ अवतरला ॥४॥
येथें बासष्ट सहस्त्र सूर्यग्रहण ॥ आणि अन्नमय असे प्राण ॥ औटहस्त मनुष्यप्रमाण ॥ जाण तूं देवी ॥५॥
पुण्य दीडविस्वे निपुण ॥ पाप साडेअठरा विस्वे गहन ॥ एकगुणें देतां दान ॥ शतगुणें पुण्य प्राप्त ॥६॥
कलीमध्यें वो पार्वती ॥ धर्मादि राजे राज्य करिती ॥ ते कवण कैशी स्थिती ॥ ती परिस सांगतों ॥७॥
प्रथम राजा युधिष्ठिर ॥ त्याचा शक तीन सहस्त्र ॥ आणि चव्वेचाळीस संवत्सर ॥ असे जाण ॥८॥
दुसरा राजा विक्रम जाण ॥ त्याच्या शकाचे असे मान ॥ एकशें पस्तीस वर्षे पूर्ण ॥ जाण देवी ॥९॥
तिसरा राजा शालिवाहन ॥ त्याच्या शकाचें परिमाण ॥ अठरा सहस्त्र वर्षे पूर्ण ॥ असे पैं ॥१०॥
आतां चतुर्थ जाण राजेश्वर ॥ विजयभिनंदन नामें वीर ॥ तयाचा शक दशसहस्त्र ॥ वर्षेपर्यत ॥११॥
पांचवा राहा नागार्जुन ॥ त्याचा शक परिपूर्ण ॥ चार लक्ष वर्षे जाण ॥ पार्वती वो ॥१२॥
सहावा राजा कल्क्यवतार ॥ त्याचा शक अतिक्रूर ॥ अष्टशत एकवीससंवत्सर ॥ तूं जाण आदिशक्ति ॥१३॥
कलींत गंगा अतिपवित्र ॥ महाकाळलिंग उज्जयिनी क्षेत्र ॥ त्याच्यायोगें राजे पवित्र ॥ सूर्यवंशादि ऐक ते ॥१४॥
सुकळिक १ ,सुकुम २ , चकसेन ३ , वीरसेन ४ , बृतसेन ५ , यज्ञपति ६ , अश्वपति ७ , नरपति ८ , विश्वपति ९ , अजयभूप १० , महींद्रपाल
११ ,विनयपाल १२ , विनयसूनु १३ , येनसूनु १४ , गंधर्वसेन १५ , विजयाभिनंदन १६ , विक्रमादित्य १७ , शालिवाहन १८ , नागार्जुन
१९ , महीपाळ २० , देवपाळ २१ , अमाभूपाळ २२ , देवक्रीड २३ , मुजनु २४ , ऐसे हे चतुविशति ॥ राजे धर्मे पाळिती क्षिति ॥
पुढे झाळी कैशी स्थिति ॥ ती ऐक देवी ॥१५॥
मग म्लेच्छ राजे जाहले ॥ त्यांनी सर्व धर्म आटले ॥ ऐसें पाहूनि उठावले ॥ राजे शाहाण्णव कुळींचे ॥१६॥
प्रथम राजे सूर्यवंशी ॥ दुजे झाले सोमंवशी ॥ तिचे ते शेषवंशी ॥ ब्रह्यबंशी चतुर्थ ॥१७॥
राजे मोरे आणि कदम ॥ यांसी युद्व होईल अनुपमा ॥ पुढें कलींतील राजगोत्रे उत्तम ॥ सांगतों ऐका ॥१८॥
राजे यादव १ जाधव २ , चवाण ३ , हे सूर्यवंशी वसिष्ठ गोत्री ॥ मोहिते १ , सुरवे २ , साळुंखे ३ , ब्रह्यचाळकी ४ , गुजर ५ , कदम
६ ,शंखपाळ ७ ,निकव ८ , मोरिये ९ , क्रीदंत १० , हुले ११ , इने १२ , मीन १३ , कळिंब १४ , हे सोंमवंशी व्यास गोत्री ॥ नीकाश
१ ,राखचिये २ , बडिये ३ ,गुंजवठे ४ , दौड ५ , गोळहिम ६ , वाघ ७ , हत्तिये ८ , सावंत ९ , बागुल १० , वाणियडे ११ , कन्होजे १२ , वीगवले
१३ , जवदंडे १४ , गरुड १५ , लाड १६ , गौड १७ , कानडे १८ , कर्नाटक १९ , खेसीये २० , लिये २१ , इखे २२ , थोरात २३ , ॥
आणिक राजे नाना कुळींचे ॥ ते राज्य करिती भूमंडळाचें ॥ सागतों ऐक कुळ त्यांचे ॥ आदिशक्ति ॥१९॥
शिंदे आणि भोसले ॥ तैसेच रायभोंसले ॥ ऐसे हे अकुळीर बोलिले ॥ कुळी ऐसे ॥२०॥
आणिक कलियुगीं होतील ॥ म्लेच्छ राजे माजतील ॥ ते कोण म्हणशील ॥ तरी ऐक वो देवी ॥२१॥
खोदलामलुका , मुलतानमलुका , ॥ दिबादिमलुका , खुरासनमलुका ,॥ तैसाच पांचवा महिलमलुका , ॥ आणिक ते परियेंसी देवी ॥२२॥
घोडमुखे १ , हपसी २ , हुर्मुज ३ , रुमीरज ४ , फिरंगी ५ , आरब ६ , पारस ७ , मुळहुस ८ , मुळवात ९ , तुरकी १० , तुरकबज ११ , दाखिन
१२ , आफराण १३ , लोर १४ , जोर १५ , अबाबाळ १६ , सय्यद १७ , सर्वस १८ , चंदनमोहरी १९ , बीबल २० , कादीमुलना २१ , कीतेव
२२ , सेखर २३ , पठाण २४ , ऐसे हे म्लेंच्छ सांगितले ॥ कलियुगांत हेचि वहिले ॥ सर्व राज्य करितील भले ॥ वर्षे तेराशेंबत्तीस ॥२३॥
आदि पादशाही बुडेल ॥ मग वजीर पादशःआ होईल ॥ सर्व पृथ्वी म्लेंच्छीं व्यापिजेल ॥ कलियुगामाझारीं ॥२४॥
आणि गांवोगांवी पादशहा ॥ द्वीतीय तो निजामशहा ॥ तृतीय पापें वर्तती ॥ पृथ्वीवरी ॥२५॥
प्रथम आदिलशहा पादशहा ॥ द्वितीय तो निजामशहा ॥ तृतीय तानशहा पादशहा ॥ मलीकशहा जाण चतुर्थ ॥२६॥
यांहून पादशहा अन्य ॥ ठायीं ठायीं होतील जाण ॥ अकुळीचे ते कोण कोण ॥ सांगतो ऐक ॥२७॥
पहिला बरबर पादशहा १ , त्याचा तीवर २ , त्याचा हमाउ ३ , त्याचा जहांगीर ४ , त्याचा शहासुजा ५ , त्याचा अकबर ६ , त्याचा
शाहाजान ७ , त्याचा औरंग ८ , त्याचा बहादुर ९ ॥ ऐसेच कितीएक मोंगल ॥ तेचि पादशहा होतील ॥ त्यांनी सर्व पृथ्वी आटेल ॥ आणि पापकर्मे होतील जाण ॥२८॥
मग सात दुराया प्रवर्तती ॥ क्षत्रिय क्षात्रधर्म टाकिती ॥ तस्करकर्मी प्रवर्तती ॥ क्रियाभट ब्राह्यण ॥२९॥
गाई अल्प दूध देती ॥ महानद्यांसी उतार होती ॥ आणि मेघ अल्प वर्षती ॥ पृथ्वी अल्पधान्य होईल ॥३०॥
वनस्पती निष्फळ होतील ॥ मनुष्यें असत्य बोलतील ॥ आंवळ्याप्रमाणे भिक्षा घालतील ॥ स्त्रिया परपुरुषीं रतती पैं ॥३१॥
उत्तम लोक करिती मांसभक्षण ॥ कन्या वेदविक्रय करिती ब्राह्यण ॥ बहुत भांडविद्या प्रवर्तन ॥ सिविद्येसी मान नाहीं ॥३२॥
गोंधळीं भराडी यांचे गाणें ऐकती ॥ हरिनाम ऐकतां कंटाळती ॥ सर्व प्रजा आचार सांडिती ॥ स्वधर्माचा ॥३३॥
राजे धर्मनीतीनें न चालती ॥ परद्रव्यीं अभिलाष करिती ॥ एकाकार सर्व जाती ॥ होतील जाण ॥३४॥
ऐसीं अधर्मकर्मे पापें होती ॥ मग त्या कलियुगांचे अंतीं ॥ धर्म स्थापावया श्रीपती ॥ धरील कलंकी अवतार ॥३५॥
आतां हा दहावा अवतारु ॥ माता गायत्री पिता जमनरु ॥ गुरु सिंधु राणी कारजानी पवित्रू ॥ त्या क्षेत्री अलम दुनिया पालटेल ॥३६॥
गंगेयमुनेमध्यें जाण ॥ श्रोत्रिय पवित्र अथर्वणी ब्राह्यण ॥ तो मातंगस्त्रीशीं करिल लग्न ॥ हें जाण सत्य देवी ॥३७॥
तये मातंगीचे उदरीं ॥ आपण अवतरेल श्रीहरी ॥ हा कलंकी अवतार यापरी ॥ जाण देवी ॥३८॥
मग ऋतुमध्यम नामें वारु ॥ त्यावरी बैसेल तो अवतारु ॥ आणि करील संहारु ॥ म्लेंच्छरुपी दैत्यांचा ॥३९॥
अठरा हात लांबी खड् धरील ॥ तैं सर्व जनां आकातं होईल ॥ दुष्ट लोक नाश पावतील ॥ ते समयीं ॥४०॥
ऐसा त्या कलीच्या अंती ॥ कलंकीनामक श्रीपती ॥ तयासी वरावया देवता सती ॥ कोल्हापुरची उद्युक्त असे ॥४१॥
ती महालक्ष्मी आपण ॥ हातीं घेवोनि माळ जाण ॥ प्रतीक्षा करील तयालागुन ॥ रात्रदिवस सर्वदा ॥४२॥
मग दशवायु अग्नीचा घोडा ॥ सित खड् घेऊनि राऊत पुढां ॥ ऐसा कलियुगांचा घोडा ॥ करील नारायण ॥४३॥
सुलग्नें खांडे प्रक्षाळतील ॥ तैं सर्व जनासीं आकांत होईल ॥ मग पल्लव छत्रें निघतील ॥ ते समयीं ॥४४॥
ऐसा प्रळय होईल ॥ मग राउळा चालतील ॥ आणि म्लेच्छांवरी जागेल ॥ प्रताप कलंकीचा ॥४५॥
तेथें अद्वुत वीर मार होईल ॥ आणि द्वादश सूर्य तपतील ॥ सर्व बीज घालील ॥ अवतारीं जान ॥४६॥
भूमीसी प्रळय होईल ॥ सर्वासी अनन्य धर्म वर्तेल ॥ ऐसे कलीचे धर्म होतील ॥ जाण देवी ॥४७॥
अंगुष्ठाप्रमाण मनुष्यें होती ॥ घराचे परी शेतें करिती ॥ त्याच पिकानें पोटे भरती ॥ सहकुटुंब ॥४८॥
देही वसे अल्प बुद्वी ॥ देही कर्माकर्मासंबंधी ॥ अल्प सिद्वी पापबुद्वी ॥ आणि कुकर्मे फार होतील ॥४९॥
मग आपण सर्वेश्वर ॥ जो कलंकीरुपी अवतार ॥ तोचि एकला ईश्वर ॥ उरेल जाण ॥५०॥
ऐसें कलियुगांती होईल ॥ सर्व बीज एकवटेल ॥ आणि सर्वासी प्रळय होईल ॥ अपार जाण देवी ॥५१॥
मग तो श्रीपरमेश्वरु ॥ एकलाच निराकारु ॥ ज्यासी नाम सर्वेश्वर्य ॥ तो एकला एक ॥५२॥
ऐसें ऐकूनि बोलणें ॥ मग उमा काय म्हणे ॥ शेवटीं परी कवण ॥ ती मज सांगा देवा ॥५३॥
ऐसें पुसिलें दुर्गेंने ॥ मग उत्तर दिवलें त्रिनयनें ॥ कीं सर्व मजमाजी उपजणें ॥ जाण देवी ॥५४॥
जैसें भूमीस पेरिजे बीज ॥ सर्वासी तें शेंडा दावी निज ॥ मग तें एकवटिजें सहज ॥ पिकलें म्हणुनी ॥५५॥
तैसें सर्व मजपासुनी जाहलें ॥ अनंतयुगें विस्तारलें ॥ मग तेंच उरलें एकलें ॥ अनंतयुगी ॥५६॥
तैसी मागें सांगितली युगसंख्या ॥ तैशीच पुढें होईल असंख्या ॥ ऐसा मी खेळ मांडितों निका ॥ निमिषामाजी ॥५७॥
ऐसें विरुपाक्ष बोलंता ॥ उमा झाली तन्मयचित्ता ॥ मग ठेऊनि चरणी माथा ॥ मागुती पुसे शिवातें ॥५८॥
आतां पुन :शंकराप्रती ॥ पुसती झाली पार्वती ॥ तें सांगतों अवधारा चित्तीं ॥ म्हणे श्रीमहादेव ॥५९॥
इति श्रीमूळस्तंभे शिवपार्वतीसंवादे सप्तदशोऽध्यायः ॥१७॥
श्री सांबसदाशिवापर्णमस्तु ॥ श्रीरस्तु ॥