पाचवीची गाणी - बाळाचे नशीब
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सटवी कपाळावर मारते लेखणीचा फ़टकारा
नोंदावते जन्म-जीवन-मृत्यु
आणि ब्रह्यदेव लिहितो नशीब!
मूल जन्मले त्या रात्री आले
सटवी व ब्रह्यदेव बाळंतिणीच्या ओसरीवर;
ओसरी होती स्वच्छ सारवलेली तिने
पाहून मनापासून आनंदले सटवी आणि ब्रह्यदेव
बाळाचे नशीब त्यांनी कुठे लिहिले?
बाळाच्या पायाच्या टाचेवर लिहिले!
बाळाचे नशीब त्यांनी कुठे लिहिले?
बाळाचे नशीब गुडघ्यावर लिहिले!
बाळाचे नशीब त्यांनी कुठे लिहिले?
बाळाचे नशीब छातीवर लिहिले!
बाळाचे नशीब त्यांनी कुठे लिहिले?
बाळाचे नशीब कपाळावर लिहिले!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP