पाचवीची गाणी - आशीर्वाद
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
आशीर्वाद
बारीक काड्यांची बारीक नेसली साडी
जाऊन ओणवेली सासर्याचे पायी
सासर्यानं आशीर्वाद दिला
सुने तू होशील ग असात पोरांची मायू
बारीक काड्यांची बारीक नेसली साडी
जाऊन ओणवेली सासर्याचे पायी
सासूनं आशीर्वाद दिला
सुने तू होशील ग सात पोरांची मायू
बारीक काड्यांची बारीक नेसली साडी
जाऊन ओणवेली सासर्याचे पायी
भावल्यानं आशीर्वाद दिला
सुने तू होशील ग सात पोरांची मायू
(मायू-माय/आई, भावला-मोठा दीर)
आशीर्वाद
बारीक रेषांची झिरझिरीत साडी नेसली
सासर्याच्या पायी जाऊन वाकली
सासर्याने आशार्वाद दिला
सूनबाई, तू ग होशील सात पोरांची आई
बारीक रेषांची झिरझिरीत साडी नेसली
सासूच्या पायी जाऊन वाकली
सासूने आशार्वाद दिला
सूनबाई, तू ग होशील सात पोरांची आई
बारीक रेषांची झिरझिरीत साडी नेसली
मोठ्या दिराच्या पायी जाऊन वाकली
दिराने आशार्वाद दिला
सूनबाई, तू ग होशील सात पोरांची आई
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP