पाचवीची गाणी - वाढा रं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
डवली भरून वाढा रं
सुपानं टाकली पानकुटली ते
डोकर्या आसला पण बोलवा रं
तिला डवली भरून वाढा रं
सुपानं टाकली पानकुटली ते
डोकर्या बासला पण बोलवा रं
त्याला डवली भरून वाढा रं
सुपानं टाकली पानकुटली ते
मामीसला पण बोलवा रं
तिला डवली भरून वाढा रं
सुपानं टाकली पानकुटली ते
मामाला पण बोलवा रं
त्याला डवली भरून वाढा रं
(डोकरा-म्हातार, डवली-डाव, पानकुटली-’काकडी’ किसून ’चाई’ च्या पानावर केलेला पानगा)
डाव भरून वाढा रे
सुपात ठेवली ही पानकुटली
म्हातार्या आईलाही बोलवा रे
तिला डाव भरून दारू पाजा रे
सुपात ठेवली ही पानकुटली
म्हातार्या बाबालाही बोलवा रे
त्याला डाव भरून दारू पाजा रे
सुपात ठेवली ही पानकुटली
मामीला देखील बोलवा रे
तिला डाव भरून दारू पाजा रे
सुपात ठेवली ही पानकुटली
मामाला देखील बोलवा रे
त्याला डाव भरून दारू पाजा रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP