श्रमगीते - एक जोर करा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
एक जोर करा
एक जोर करा तुम्ही नारानूं देवा
हैसा रं नारानूं देवा हैसा रं नारानूं देवा
नारानू देवा तुम्ही जमतील येवां
हैसा रं जमतील येवां हैसा रं नारानू देवा
दोन जोर करा तुम्ही हिरोबा देवा
हैसा रं हिरोबा देवा हैसा रं हिरोबा देवा
हिरोबा देवा तुम्ही जमतील येवां
हैसा रं जमतील येवां हैसा रं हिरोबा देवा
तीन जोर करा तुम्ही वाघोबा देवा
हैसा रं वाघोबा देवा हैसा रं वाघोबा देवा
वाघोबा देवा तुम्ही जमतील येवां
हैसा रं जमतील येवां हैसा रं वाघोबा देवा
पहिला जोर लावा
पहिला जोर लावा तुम्ही नारान देवा
हैसा रे, नारान देवा, हैसा रे, नारान देवा
नारान देवा तुम्ही मदतीला यावे
हैसा रे, मदतीला यावे, हैसा रे, नारान देवा
दुसरा जोर लावा तुम्ही हिरोबा देवा
हैसा रे, हिरोबा देवा, हैसा रे, हिरोबा देवा
हिरोबा देवा तुम्ही मदतीला यावे
हैसा रे, मदतीला यावे, हैसा रे, हिरोबा देवा
तिसरा जोर लावा तुम्ही वाघोबा देवा
हैसा रे, वाघोबा देवा, हैसा रे, वाघोबा देवा
वाघोबा देवा तुम्ही मदतीला यावे
हैसा रे, मदतीला यावे, हैसा रे, वाघोबा देवा
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP