श्रमगीते - डोंगर कौलारू
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
डोंगर कौलारू
डोंगर कौलारू मथू बाजारी जाय रे
जाय रे जाय रे हैसा हैसा
आरे हातानं पिशवी मथू बाजारी जाय रे
जाय रे जाय रे हैसा हैसा
आरे हातानं पिशवी मथू भाजीपाला घेय रे
घेय रे घेय रे हैसा हैसा
हातानं पिशवी मथू आली धावपल करीत रे
आली रे आली रे हैसा हैसा
धावपल करीत मथू घराला आली रे
आली रे आली रे हैसा हैसा
डोंगर कौलारू
डोंगर कौलारू मथू बाजाराला जातेय रे
जातेय् रे जातेय् रे हैसा हैसा
अरे हातात पिशवी, मथू बाजाराला जातेय् रे
जातेय् रे जातेय् रे हैसा हैसा
अरे हातात पिशवी, मथू भाजीपाला घेतेय् रे
घेतेय् रे घेतेय् रे हैसा हैसा
हातात पिशवी मथू धावपळ करीत येतेय् रे
येतेय् रे येतेय् रे हैसा हैसा
धावपळ करीत मथू घरी परत आलीय् रे
आलीय् रे आलीय् रे हैसा हैसा
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP