श्रमगीते - पांगार्याची काडी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पांगार्याची काडी
पांगार्याची काडी बाय् रंगा फ़ुलेली, हैसा रं हैसा
बारीकशी पोरे तिचा भय्याजी नवरा, हैसा रं हैसा
भय्याचे बटराला भुलली गु बाय् तिचा भय्याजी नवरा
हैसा रं हैसा, हैसा रं हैसा
(बटर-कडक, गोल पाव इथे ’त्यांचे पिळदार शरीर’ हा अर्थ, भय्याजी-पाव विकणारा)
पांगार्याची फ़ांदी
पांगार्याची फ़ांदी बाई रंगीत फ़ुलली, हैसा रे हैसा
एवढीशी पोर तिचा भय्याजी नवरा, हैसा रे हैसा
भय्याच्या बटराला भुलली ग बाई
तिचा भय्याजी नवरा, हैसा रे हैसा
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP