अंक दुसरा - प्रवेश पांचवा

गडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.


[ अण्णासाहेब व यशोदाबाई.]

अण्णाः तुला सत्रा वेळा सांगितलें तरी तुझ्या कांही घ्यानांत राहात नाहीं ! औषधाची आबाळ करून माझा प्राण का घेणारआहांत तुम्ही ? पहांटेस झोंप येत नाहीं म्हणून तें औषध शास्त्रीबुवांनीं मुद्दास दिलें ! तें कांहीं पहांटेस द्यायची आठवण राहिली नाहीं !
यशोदाः द्यायचें तरीं कसें ? पहांटेस आपल्याला लागली होती झोंप ! म्हटलें चांगली झोंप लागली आहे ती कशाला मोडावी ?
अण्णाः शिकस्त झाली आतां ! झोंप येत नाहीं म्हणून मी औषधें आणितों आणि तुझें म्हणणें मला झोंप लागली होती ! काय म्हणावें तुम्हांला आतां ?
यशोदा: खरेंच झोप लागली होती ! खोटें कशाला सांगूं मी ?
अण्णा: भलतेंत ! झोंप नाहीं ती ! ग्लानि असेल ! औषधावांचून आजार्‍याला झोंप येणारकशी ? आली तरी ती खरी झोंप नाहीं. पुन्हा मल अशी झोंप लागली तरजागें करून औषध देत जा म्हणजे मी पुन्हां शास्त्रोक्त निजत जाईन ! मला असली वेडीवांकडी झोंप नको यशोदाः बरें, आतां नाहीं विसरायची !
अण्णाः बरं, आतां आण !
यशोदाः आतां कशाला अवेळीं ?
अण्णाः अवेळ कशाची ? औषध केव्हांही घ्यावें आणि कितीही घ्यावें. जा, आण लौकर! जा ! जा ! लौकर! (यशोदाबाई जातात.)
अण्णा: (स्व). काय कटकट करावी लागते पहा ! ही पुडी घ्यावी आतां ! (पुडी उलगडून पाहतो.) पुरती चिमुट चिमुट सुद्धा नाहीं. वैद्यलोक आतांशा पैशाकडे फारबारकाईनें पाहूं लागले; अगदीं सोन्यामोत्याच्या भावानें औषधें देतात ! (पुडींतील औषध तोंडांत टाकतो.) बाकी शास्त्रीबुवांचीं औषधें रामबाण खरीं ! त्यांनीं म्हटल्याप्रमाणें खरेंच हुशारी आल्यासारकें वाटूं लागतें ! माल वाटतें दुसरी पुडी घेतली तरदुप्पट हुशारी येईल ! पाहतोंच प्रचीति ! (दुसरी पुडी घेतो.) अरेच्या हुशारी ! बाहवा रे औषध ! शाबास ! रात्रीं खावें तूप आणि सकाळीं पहावें रूप ! आपण तिसरीही पुडी घेणार! )तिसरी पुडी घेतो.) वाहवा, वाहवा, नवीन जन्मघेतल्यासारखें वाटतें ! मला वाटतें चोवीस तास या पुडयांचाच खुराक चालू ठेवावा ! पण पुडया कुठें आहेत जास्त आतां ? (फडकें झाडतो. कांहीं पुडया पडतात.) अरेच्या ! या पुडया कसल्या ? (पडीवरील अक्षरें वाचतो.) अरें, हुशारीच्या पुडया तरया ! मग मी घेतल्या त्या कोणत्या आणि त्यांनीं हुशारी आली कशी ! हां, आलें लक्षांत ! पहांटेस खरी झोप न येतां झोपेचा भास झाला ! तशीच आतां हुशारी आल्याचा सुद्धां हा भासच असावा ! मला वाटतें माझा रोग फारबळावत चालला ! त्यानें असे विलक्षण भास होतांत ! आतां खरें तरी कोणतें आणि भास तरी कोणता? सध्यां जे कांहीं दिसतें. त्यावरविश्वास ठेवतां कामा नये ! बरें पण मीं खाल्या त्या पुडया तरी कशाच्या ? (त्या पुडयांवरील अक्षरें वाचतो. घाबरून) अरे बाप रे, या तात्यांच्या नेत्रानंदकज्जलाच्या पुडया ! आणि त्यांत विष असेल तर! हो डोळ्यांच्या औषधाम्त विष असावयाचेंच ! छे: आहेच ! हें, माझें डोकें सुद्धां फिरूं लागलें ! हें जिकडे तिकडे हिरवेंचारदिसूं लागलें ! आतां कसें करावें ? ( मोठयानें ओरडून) अहो पिलंभट ! धांवा ! धांवा ! पिलंभट ! अहो घात ! घात !  
[पिलंभट धांवत घाबर्‍या घाबर्‍या येतो.]
पिलं: (स्व.) उंदीरमेल्याची थाप टोकावी आतां. (प्र.) घात. अणासाहेब, घात ! अहो घात, घात !
अण्णाः अहो घात, भयंकरघात, घात !
पिलं: घात ! भयंकर! घात.
अण्णाः अहो केवढा घात ?
पिलं: अगदीं आपण म्हणतों येवढा घात. घात.
अण्णाः आतां कसें करावें ?
पिलं: आतां कसें करावें ? घात ! अहो ! घात !
अण्णाः अहो घात ! घात ! पण करायचें कसें आतां ?
पिलं: करायचें काय दुसरें ?आतांच्या आतां पळालें पाहिजे इथून !
अण्णा: पळून काय होणार? यमापुढें किती पळणार?
पिलं: मग दुसरा काय उपाय करणारइथें ?
अण्णाः यावरकांहीं औषध नाहीं ?
पिलं: कांहीं औषध नाहीं ! घटकेचा उशीरकेला तरनिकाल लागायचा !
अण्णाः (खालीं बसतो) माझे हातपायच मोडलें ! आतां पळणारतरी कुठें ? घात ! औषध नाहीं ना कांहीं उपयोगी ?
पि लां: नाहीं ! पण आपल्याला कसें कळलें हें ?
अण्णाः अहो माझें मला क्सें कळणारनाहीं ?
पिलं: म्हणजे ? ही गोष्ट प्रथमपाहिली मीं !
अण्णाः पण केळी मीं ना ! या पहा पुडया हुशारीच्या ! अन् या मी खाल्लेल्या नेत्रानंदकज्जलाच्या ! भिनलें त्याचें विष !
पिलं: अहो हें निराळेंच ! मी म्हणतों तें निराळें ! अहो, आपल्या घरांत मेलेला उंदीर!
अण्णाः ( ताडकन उठून) मेलेला उंदीर! अहो, कुठें ? पिलंभट कुठें ?
पिलं: अहो आपल्या माजघरांत, घात: माजघरांत !
अण्णाः माजघरांत; अहो घात ! मघाच्याहून मोठा घात !
पिलं: म्हणून तरमी आपल्यापेक्षा मोठयानें ओरडत होतों !
अण्णाः तुम्ही पाहिलात स्वतः ?
पिलं: अगदीं या डोळ्यांनीं पाहिला. तो पहा तिथें आहे, चला.
अण्णा: अहो, नको, मी नाहीं यायचा त्याच्या जवळ. धांवा, मधूला बोलवा; माधवाला बोलवा; आतांच्या आतां करंजगांवीं चला सारे ! धांवा; अहो धांवा म्हणतों ना ? करा तयारी निघण्याची ! (पिलंभट धांवट जातो.) अरे मधू, माधवा, उठा ! बांधा पेटया; चला, गाडया आणा,  निघा पळा. [यशोदाबाई येतात.] उठा ! बांधा पेटया; चला, गाडया आणा, पळा. (इकडून तिकडे धांवतो.)
यशोदाः (घाबरून) अग बाई ? असें काय करायचें हें ? हें काय बोलायचें असें?
अप्णा; अग धांव, पेटया बांध ! ऊठ पळ. अरे, धांबा, पळा; गाडया आणा.
यशोदा: (मोठयानें) अग बाई आतां काय करूं ? इतक्यांत कुणी कौटाळ केलें वाटतें ! अहो पिलंभट धांवा हो धांवा ! घात: अंगारा आणा. अहो पिलंभट, धांवा; अंगारा ! अग बाई ! आतां काय करूं ?
अण्णा: (स्व.) तिकडूनच आली ही वाटतें ? झाला घाट ! ताप वायु सुद्धां झाला वाटतें ! झाली-बडबड सुद्धां करायला लागली ! आतां काय करावें ? (प्र.)
अहो पिलंभट ! धांवा ! घात. ह तिकडून आली. हिला ताप भरून वायुसुद्धां झाला ! अहो धांवा घात ! डागण्या आणा ! घात ! अरे, डागण्या आणा !
यशोदाः घात ! सर्वस्वी घात ! अहो पिलंभट इकडे बाहेरघात झाला इतक्यांत ! काय ही बडबड ! अहो धांवा ! आंगरा आणा ! घात: (अण्णासाहेब “वायू, घात, डागण्या” असें ओरडतात व यशोदाबाई “बाहेरवा, घात, अंगारा,” असें ओरडतात; मधू, माधव व पिलंभट येतात.)
पिलं: अण्णा, बाई, असें घाबरूं नका ! कोणाला कांहीं झालें नाहीं अजून !
अण्णाः अहो नाहीं झालें कसें ? मग ही ओरडते कां अशी ?
यशोदाः आपण ओरडायचें म्हणून !
अण्णाः अग, घरांत उदीरपडल्यावरकोण नाहीं ओरडणार?
यशोदाः असें ! मला वाटलें आपल्याला बाहेरवा झाला म्हणून मी भिऊन हांका मारल्या पिलंभटांना,
अण्णा: मला वाटलें माजघरांतून तूं आलीस तेव्हां तुला ताप भरून वायु झाला. हं पिलंभट. पहा कुणाला झाला आहे का ताप आणि करा बांधाबांध लौकर.
मधु: अण्णा, अहो आहे काय हें ? एकादा उंदीरमेला म्हणून झालें काय ?
अण्णाः अरे बावा, घात, या काळांत जीवंत सिंहापेक्षां मेलेल्या उंदरालाच जास्त भ्यावें लागतें. समजलास !
माधवः रास्त आहे. आत्मा म्हटला म्हणजे सर्वांचा सारखाच. सर्वत्रएकच ब्रह्मपसरलें आहे. मूळ ब्रह्म, तिथून पुढें ओंकारध्वनि निधून पुढें माया
अण्णा: अरे, पुरे, बाबा तें राहुं दे आतां. पिलंभट उठा लवकर, धांवा, तांगे आणा, पहिलीच गाडी सांपडली पाहिजे, जा. मधु, पळ.
मधुः पण अण्णा
अण्णाः सांगितलें ना आतां वेळ घालवूं नका म्हणून. गाडया, बग्या, छकडे, तांगे, दमण्या, बंडया, खटारे, एकके, फैठणी, जें सांपडेल तें घेऊन या !
माधव: त्यांत भेद तो काय पहावयाचा ! हा तांगा, हा छकडा, ही बंडी, हा सारा स्थूल द्दष्टीस भ्रमआहे. अंतर्द्दष्टीला एकाकारानें एकाची शून्यांत आणि
अण्णाः याला; मला वाटतें झालें आहे कांहीं तरी
माधवः व्हावयाचें आहे काय ? या सार्‍या उपाधि
अण्णा: खरी उपाधि आहे बुवा तुझी ! पिलंभट पळा; उगीच वेळ घालवूं नका !
पिलंभट: बरें, पण आपण त्या पुडया खाल्लया त्यांचें काय ?
अण्णाः अहो, त्याचें काय ! मला तरविषसुद्धां चढेनासें झालें आहे. प्रकृति अगदीं अदशी, होऊन बसली आहे ! नसताभास होतो आहे !
माधव: अहाहा ! हीच उन्मनी अवस्था. मुमुक्षेची तृष्णा लागण्यापूर्वीं मुमुक्षु जनाची हीच अवस्था होते. इथून पुढें तळमल-पुढें पिपासा-पुढें साक्षात्कार-पुढें मुक्ति ! अण्णा, धन्य, धन्य तुमची ! तुर्यावस्था सपून तिच्या पुढची अवस्था तुम्हांला प्राप्त होणार! ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, विसोबा खेचर
अण्णाः म्हसोबा गाढव-पुरे करही यादी ! आणखी कांहीं वेळ असा घोळ घालून बसलास तररोगानें माझी खरोखरीच पढची अवस्था होणार! धन्य आहे तुझी ! पिलंभट, उठा ! मधु पळ ! हे पहा तात्या आलेच ! [तात्या येतात.]
अण्णाः तात्या, चला, घरांत उंदीरपडला ! आतां इथें राहून उपयोगी नाहीं.
तात्या: नाहीं खरें; पण चालायचें कसें ! घरांतून बाहेरपडायचें म्हटलें तरपूर्वाभिमुख गमन करावें लागेल आणि हा मुहूर्त तरपूर्वाभिमुख गमनाला विरोधी आहे ! या वेळीं उत्तराभिमुख गमन लाभेल काय तें !
अण्णाः अहो, आतां मुहूर्त पाहावयाला तरी अवकाश कुठें आहे ? हातघाईच्या वेळीं सारे मुहूर्त सारखेच !
माधवः हेंच खरें ! हरीचिया दासा ॥ शुभकाळ अवघ्या दिशा ॥
अण्णाः माझी आई, तुला दहा दिशा मोकळ्या आहेत; पण आतां जीभ मोकळी सोंडू नकोम! काय तकलीफ आहे पहा ! हं, तात्या, आतां निघालेंच पाहिजे !
तात्याः अरे काय म्हणणें हें, अण्णा ? हें पहा, (पंचांग दाखवितात.) संकट होय, क्लेश उपजे; सुखनाश; मुहूतें चालेल तो सुख पावेल. गोरक्ष पुसे; मत्स्येंद्रसांगे; हा केवल मुहूर्तराज होय ! सहदेव म्हने भाडळीशीं
अण्णाः आपली मति हरली बुवा आता! हा प्राण जाण्याचा मुहुर्त दिसतो; मग तात्या, आतां करायचें तरी कसें ?
तात्याः करायचें काय त्यांत ? त्या उत्तरेकडच्या खिखकींतून सारे बाहेरपडा म्हणजे झालें !
यशोदा: त्यापक्षीं, मी म्हणतें, तेवढें परस्थान
अण्णाः आतां पायांवरडोकें फोडून घेऊं का एकेकाच्या ! आतां परस्थान नको, संस्थान नको; पिलंभत
यशोदाः असें काय म्हणायचें भलतेंच ? परस्थान ठेविल्यावांचून का कुठें निघणें म्हटलें आहे ?
पिलंभट: आतां असें करूं द्या. परस्थान घेऊन मी त्या उत्तरेकडच्या खिडकीवाटे बाहेरपडतों आणि मग मंडळी येऊं द्या पुढल्या दारानें ! म्हणजे सार्‍या अडचणी भागतील !
अण्णाः शाबास. असेंच करा. चला, तात्या, पिलंभट, त्या विषाच्या पुडया खाल्लया त्यांच्यावरउतारा पण आणा बरें का ? मला भलभलताभास होऊं लागला आतां !
पिलंभट: (स्वतःशीं) न होईल तरमग माझी करामत कुठें राहिली ? सार्‍या पुडया इथून तिथून एक. घरचा वैद्य.
अण्णाः हां, निघा आतां.
पिलं: जातों. तांगे आणतों आणि आपल्यासाठीं उतार्‍याचें औषधहि आणतों.
अण्णा: औषध आणाच; तें घेईन आगगाडींत बसल्यावर! आधीं तांगे आणा ! तांगे कांहीं आगगाडींत बसल्यावरमग यपयोगी पडायचे नाहींत. तेव्हां आधीं तांगे आणा. चला, एकएक क्ष म्हणजे वर्ष आहे आतां !
यशोदा: अंगारा तरी लावूं का कुळस्वामिणीचा सगळ्यांना ?
अण्णा: नको. अंगारा आणायला सुद्धां तिकडे जाऊं नकोस, चला. काय बांधाबांध करायची ती करून घ्या लौकर! मी जाऊन बसतों सडफेवर. (जाऊं लागतात.)
तात्या: अरे, पण त्या मुहूर्ताच्या खिडकींतून
यशोदाः तेवढें तें परस्थान आधीं
माधवः कशाला ? अण्णा, तुम्हींच जा म्हणजे झालें. अग, परस्थान आणि अण्णा यांच्यांत काय भेद आहे ? आणि या खिडकींत आणि त्या दारांत तरी काय भेद आहे ?
अण्णा: वेडयांच बाजार, खरा वेडयांचा बाजारहा ! चला. (सर्व जातात.)
मधुः (जातां जांता) शाबास, पिलंभट ! संपला हा प्रवेश; आतां चला, पुढच्या कामाला लागा.  (जातात. पडदा पडतो.)

N/A

References : N/A
Last Updated : December 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP