शुक्रनीति - प्रस्तावना

प्रस्तुत नीति शुक्राचार्यांनी न लिहिता मूळ नीति भगवान् श्रीशंकरांनी लिहिली आहे.

शुक्राचार्य म्हणजे दानवांचे गुरू. हा ग्रंथ ‘शुक्र नीति ‘ या नावाने प्रसिद्ध असला तरी मूळ ग्रंथ शुक्राचार्यांवी न लिहिता मूळ नीति भगवान संकरांनी लिहिली आहे. मूळ नीतिशास्त्राला ‘ वैशालाक्ष नीतिशास्त्र ‘ असे नांव आहे. त्याचे इंद्राने जे संक्षिप्त रूप तयार केले ते ‘ बाहिदनाक शास्त्र ‘ ह्या नावांने ओळखले जाते. ते बृहस्पतीने आणखी संक्षिप्त केले ते ‘ बार्हस्पत्यशास्त्र ‘ या नावांने ओळखले जाते. शेवटी भृगुचा पुत्र शुक्राचार्याने संक्षिप्तरूप जे तयार केले त्यालाच ‘ शुक्रनीति ‘ म्हणतात.
शुक्राचार्यांना शब्द, ऊशना, काव्य, भार्गव असेही म्हणतात. भृगु जे कवि आणि ब्रह्माचे तिसरे मानसपुत्र होत त्यांचाच पुत्र म्हणजे असुरांचे गुरू शुक्राचार्य होय.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP