अक्षरांची लेणी - गण व मंत्र
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
१. गण
वन नमा देस गुरु पहिला, गण रामसीता । हो रामा ।
दुसरा गण चौसष्ट जोगीनी, तिसरा गण त्रिभवनी । हो रामा ।
चौथा गण आई पांढरी, पाचवा गण पाचीपांडवाले । हो रामा ।
सहावा गण सहा दर्शनी, सातवा गण साती आसरा । हो रामा ।
आठवा गण आठकुळी बहिरोबा,
नववा गण नवकुळी नागा । हो रामा ।
२. मंत्र
अ.
वन नम: देस गुरु । आरे आरे बोकडया
तुही माय भोरी । तुझ्या आंडाले, लावली दोरी
उतर उतर पाना, ना उतरशील तर तुहया गुरुची आन
ब.
वन नमा देस गुरु
आच्छाम् तारा महिमार धुत्त्कारा
चिडयाजेर उतरो, ना उतरशील राम लक्ष्मणाची,
साती जानकीची आन ।
क.
वन नमा देस गुरु दोन बंधू दयाळू । त्रिलोकी परत्पाळ ।
औसा कैसा ऋषी ह्या गरीबाला सोडून देरे ।
शेषा इतक्या उपर, ना देशील तं तुह्या गुरुची आन ।
हनुमान, आई पांढरी. गाईची. महादेवाची आन
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP