मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| पोळा अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - पोळा लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत लोकगीतातून प्रगट झालेला पोळा Translation - भाषांतर पोळीयाच्या दिसी गाई झाल्या वरमायां ।याहिच्यापोटचे नंदी गेले मिरवाया ॥पोळीयाच्या दिसी येसी बांधले तोरणं ।मानाचे बैल जातील तोरणाखालून ॥जमिनाचा भार उचलला कोनं?गाईच्या पुतानं जुआले देली मानं ॥गहू मी दळते एका मांडी मण-मणं ।मह्या गं घरी वसुराजाचं लगनं ॥पोळीयाचे दिसी पाच येढे मारोतीले ।सावळया बंधूचे नंदी मानाचे पुढे ॥सोन्याचं पिंपळपान पायात पैंजणं ।मिरवाया नेले बाई नंदी नेणंत्या राघोनं ॥किंवाबैल नंदिण्याचे मोठे मोठे शिंग ।दारकेच्या दिशी बांधले बाशिंग ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP