स्फुट कविता - गुरुचें पद

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : संग घडो )
अळस नको करुं ये गुरुराया ।
तुजविण नरतनु जाईल वायां ॥ध्रु०॥
या भवकाननिं भय वाटे । डोंगर अजगर कंटक वाटें ।
षड्रिपु वृकव्याघ्र टपलेत खाया ॥ तुजविण० ॥१॥
संसार शिरीं भार थोर पसारा । पळतां नये आशा चिखलचि सारा
सर्पदशेंद्रियें वेष्टिलें पायां ॥ तुजविण० ॥२॥
पडला गळ्यामधें पहा काळफांसा । आपपर जन सारे पहाति तमाशा ।
स्त्रीसुत प्रियमित्र नये सोडवाया ॥ तुजविण० ॥३॥
अज्ञान तमदरी जों घसरावें । सुचलें भले तुझे पाय स्मरावे ॥
प्रगटविसी ज्ञानभास्करोदया ॥ तुजविण० ॥४॥
करशिल सत्य दया विष्णुदासा । आहे तुझा मनिं दृढ भरोंसा
अशिच सदा मति दे गुण गाया ॥ तुजविण० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP