साईसच्चरित - श्री साईबाबांचीं वचनें
श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.
॥ शिरडीस ज्याचे लागतील पाय ॥ टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥
॥ माझ्या समाधीची पायरी चढेल ॥ दु:ख हें हरेल सर्व त्याचें ॥२॥
॥ जरी हें शरीर गेलों मी टाकून ॥ तरी मी धांवेन भक्तांसाठीं ॥३॥
॥ नवसास माझी पावेल समाधी ॥ धरा द्दढ बुद्धी माझ्या ठायीं ॥४॥
॥ नित्य मी जिवंत, जाणा हेंचि सत्य ॥ नित्य घ्या प्रचीत अनुभवें ॥५॥
॥ शरण मज आला, आणि वायां गेला ॥ दाखवा दाखवा ऐसा कोणी ॥६॥
॥ जो जो, मज भजे, जैशा जैशा भावें ॥ तैसा तैसा पावें, मीही त्यासी ॥७॥
॥ तुमचा मी भार वाहीन सर्वथा ॥ नव्हे हें अन्यथा वचन माझें ॥८॥
॥ जाणा येथें आहे साहाय्य सर्वांस ॥ मागे जें जें त्यास तें तें लाभे ॥९॥
॥ माझा जो जाहला कायावाचामनीं ॥ तयाचा मी ऋणी सर्वकाळ ॥१०॥
॥ साई म्हणे तोचि; तोचि झाला धन्य ॥ झाला जो अनन्य माझ्या पायीं ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : June 30, 2014
TOP