मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निर्मळांचे अभंग| अभंग १ ते ५ संत निर्मळांचे अभंग अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २४ संत निर्मळांचे अभंग - अभंग १ ते ५ संत निर्मळा हे संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत. Tags : abhangnirmalasantअभंगनिर्मळासंत अभंग १ ते ५ Translation - भाषांतर १) अनाथांचा नाथ कृपावंत देवा । घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥अठ्ठाविस युगें विटेवरी उभा । वामभागीं शोभा रुक्मादेवी ॥२॥पतित पावन गाजे ब्रीदावळी । पुरवावी आळी हीच माझी ॥३॥उभा विटेवरी ठेवोनी चरण । म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥२) अनंता जन्मांचे सुकृत पदरीं । तोचि उच्चारी होठी हरिनाम ॥१॥अनंता जन्माचें पुण्य जयागांठी । तोचि उच्चारी होठी हरिनामा ॥२॥अनंता जन्मांचे तपादि साधन । तोचि नारायण जपे नाम ॥३॥अनंता जन्मांची सोडियेली जोडी । तरीच लागे गोडी हरिनामीं ॥४॥निर्मळा म्हणे अनंता जन्माचें । उच्चारतां वाचे पाप जाय ॥५॥३) आजिवरी तुम्हीं तयासीं पाळिलें । अपराध साहिले चोखियाचे ॥१॥तयाचिया पाठी आमुचा कंटाळा । आला कां दयाळा सांगा मज ॥२॥हीन दीन मी पातकांची राशी । शरण पायांसी जीवें भावें ॥३॥निर्मळा म्हणे तुम्ही तो दयाळ । म्हणोनी सांभाळ करा माझा ॥४॥४) आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा । उगवा हा गोंवा मायबापा ॥१॥संसाराचा छंद नकोसा हा झाला । परमार्थ भला संतांसंगें ॥२॥जें आहे कडु तें तें लागे गोडू । गोडाचे जें गोडू तें लागे कडु ॥३॥निर्मळा म्हणे सुख तुमचे पायीं । आणिक मी कांही नेणें दुजें ॥४॥५) आनंदें वोविया तुम्हासी गाईन । जीवें भावें वोवाळीन पायांवरी ॥१॥सुकुमार साजिरीं पाउलें गोजिरीं । ते हे मिरवली विटेवरी ॥२॥कटावरी कर धरोनी श्रीहरी । उभा भीमातीरी पंढरीये ॥३॥महाद्वारीं चोखा तयाची बहिण । घाली लोटांगण उभयतां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP